Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पत्रकार हल्ला प्रकरण - पियुष तिखट याला अटक केव्हा होणार ?
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आज पियुष तिखट झाले 18 वर्षे पूर्ण झालीत वाचा सविस्तर काय आहे प्रकरण..... आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स पिपरी - कोरपना तालुक्यातील पिपरी गाव...

  • आज पियुष तिखट झाले 18 वर्षे पूर्ण झालीत
  • वाचा सविस्तर काय आहे प्रकरण.....
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
पिपरी -

कोरपना तालुक्यातील पिपरी गावातील नाल्यातून रेती चोरीला उधाण आले होते. राष्ट्रीय संपत्तीची चोरी होत आल्याचे वृत्त संकलन व छायाचित्र काढण्याकरिता पत्रकार अनिल चांदेकर हे गेले असता पिपरी येथीलच पोलीस पाटील यांच्या लहान मुलगा पियुष बंडू तिखट याने ६ महिन्यापूर्वी डोक्यावर जबर दगड मारून गंभीर जखमी केले होते. त्याच्या विरुद्ध कोरपना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता. पण त्याचे वय कमी असल्याने त्याला अटक करण्यात आली नव्हती. आज पियुष बंडू तिखट 18 वर्षाचा झाला असून आतातरी पोलीस त्याला अटक करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक माहिती घेतली असता तपास अधिकारी यांनी सांगितले कि, लवकरच पियुष तिखट याला अटक करण्यात येईल. अवैध रेती तस्करीच्या कामात वापरलेले पिपरी येथील पोलीस पाटील यांचे महिंद्रा ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात रेती तस्करीत पकडून आहे. आतातर पुन्हा एका गावकर्‍यांने रेती उपसा करण्यासाठी ट्रॅक्टर घेतले असून नदीचे पाणी कमी झाल्यावर नदीतून किती ट्रॅक्टर अवैध रेती पिपरी येथून घेऊन जातात. पोलिसांनी अवैध रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्याचा मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top