Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परिक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात कलम 144 लागू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
100 मीटर क्षेत्रांतर्गत परीक्षेदरम्यान झेरॉक्स, फॅक्स, एस.टी.डी.बुथ, पेजर, मोबाईल फोन, ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणतेही कम्युनिकेशन सव...

  • 100 मीटर क्षेत्रांतर्गत परीक्षेदरम्यान झेरॉक्स, फॅक्स, एस.टी.डी.बुथ, पेजर, मोबाईल फोन, ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणतेही कम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध
श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परिक्षा 2020 चंद्रपूर मुख्यालयाचे ठिकाणी दिनांक 11 ऑक्टोंबर 2020 रोजी सकाळी 10 ते 12 व दुपारी 3 ते 5 या कालावधीत 13 उपकेंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे उपकेंद्राच्या ठिकाणी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत  100 मीटर परिसरात प्रतिबंध करण्यासाठी कलम 144 लागू असणार आहे, याविषयीचा आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमीत केलेला आहे.

दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पुर्व परिक्षा 2020 परिक्षा उपकेंद्राच्या ठिकाणी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत परिक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरांतर्गत परिक्षार्थी व्यतिरिक्त 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती जमा होणार नाही.

सदर परिक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसर व क्षेत्रांतर्गत सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नियमित व रोजचे वाहतूकी व्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परिक्षा 2020 मधील परिक्षा उपकेंद्राच्या ठिकाणी परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर क्षेत्रांतर्गत परीक्षेदरम्यान झेरॉक्स, फॅक्स, एस.टी.डी.बुथ, पेजर, मोबाईल फोन, ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणतेही कम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील.

आदेश या परिक्षा उपकेंद्रांना लागु राहील:
विद्या विहार हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय तुकूम चंद्रपूर, रफी अहमद किदवाई मेमो. हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय घुटकाळा वार्ड चंद्रपूर,  भवानजीभाई चव्हाण हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय मुल रोड चंद्रपूर, जनता विद्यालय पाण्याच्या टाकीजवळ चंद्रपूर,  सेंट मायकेल इंग्लीश स्कूल नगिनाबाग चंद्रपूर, लोकमान्य टिळक कन्या विद्यालय, चंद्रपूर,  एफ.ई.एस. गर्ल्स हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर,  नेहरु विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर,  जनता महाविद्यालय सिव्हील लाईन चंद्रपूर, श्री.साई पॉलीटेक्नीक नागपूर रोड चंद्रपुर,  मुरलीधर बागला कॉन्व्हेंट हायस्कुल या उपकेंद्राला आदेश लागू असणार आहे.

सदर आदेश दिनांक 11 ऑक्टोंबर  2020 रोजी चंद्रपूर मुख्यालयातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पुर्व परिक्षा - 2020 चे परीक्षा उपकेंद्रावर सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अंमलात राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबधीत व्यक्ती वा इसम प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. 







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top