- राजुरा येथील सर्वज्ञात फोटोग्राफर योगेश राचर्लावार यांचा असाही सेवाभाव
राजुरा -
राजुरा येथील सर्वज्ञात फोटोग्राफर योगेश राचर्लावार यांचे घरी कन्यारत्न कु.कनक च्या आगमना निमित्य आनंद द्विगुणित झाला. राचर्लावार कुटुंबाने सामाजिक जाणिवतेची जाण ठेऊन बाळू संकल्पनेतून एका गरोदर मातेला पोषण आहाराची भेट बाळू मार्फत दिली. गरोदर मातेला बाळू भेट देण्याचा उद्देश हाच की त्या मातेला होणारे बाळ कुपोषित जन्मू नये. याप्रसंगी बाळू चे अमित महाजनवार, अनिल पुरटकर, योगेश राचर्लावार, सागर राचर्लावार पंचशील वॉर्ड राजुरा येथील अंगणवाडी सेविका दर्शना रागीट उपस्थित होते.
यापूर्वी ज्या गरोदर मातांना बाळू भेट देण्यात आली त्यांची बालके सुदृढ जन्मल्याचे अंगणवाडी सेविका दर्शन रागीट यांनी या वेळी संगितले व बाळू भेट त्यांचा लाभार्थ्यांना मिळत असल्याने त्यानीं आनंद व्यक्त केला. कुपोषित बाळ जन्मालाच येऊ नये या करिता बाळू च्या माध्यमातून प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन अमित महाजनवार यांनी याप्रसंगी केले.








टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.