Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सोळा खाजगी रुग्णालयांची तपासणी करून एक दिवसात अहवाल सादर करा - खासदार बाळू धानोरकर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक कोरोना बाधिताची लूट तातडीने थांबवण्याचे खासदारांचे निर्देश मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी चंदपूर - जिल्हयात का...

  • विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक
  • कोरोना बाधिताची लूट तातडीने थांबवण्याचे खासदारांचे निर्देश
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चंदपूर -

जिल्हयात काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाटयाने वाढत चालली आहे. त्याची दखल घेत प्रशासनाने शहरातील सोळा खासगी दवाखाने अधिग्रहित केले आहे. मात्र, या रूग्णालयातून बाधितांची लुट सुरू असल्याच्या तक्रारी मिळत आहेत. त्याची दखल खासदार बाळू धानोरकर यांनी घेतली. शनिवारी विश्रामगृहात तातडीने बैठक घेत लूट थांबविण्याचे निर्देश दिले. एक दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांना दिल्या. जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या अकरा हजारावर पोहोचली आहे.आतापयेत आठ हजार चारशे छतीस रूग्ण बरे झाले तर तीन हजार एकशे अठेचाळीस रूग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चंदपूर शहरातील सोळा रुग्णालय अधिग्रहित करण्यात आली आहेत. येथे अनेकजण उपचार घेत आहेत. उपचार घेणारयांची परिस्थिती बेताचीच आहे. मात्र जीव वाचविण्यासाठी अनेकांचा आटापिटा सुरू आहे. या परिस्थितीत रूग्णांची खासगी रूग्णालयांतून लूट सुरु आहे. पीपीई किटची किमत पाचशे रूपये आहे. मात्र बाराशे ते पंधराशे रूपये या किटसाठी खासगी रूग्णालयातून घेतले जात आहे. कोरोनाबाधितांच्या रक्त तपासण्या करण्यात येतात. त्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जात आहे. अशीच लूट रूग्णवाहिकाधारक करीत आहे. कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे आधीच लोकांच्या हाती पैसे नाही. कसेतरी लोक जीवन जगत आहेत. त्यात उपचाराच्या नावाने अधिग्रहित करण्यात आलेल्या खासगी रुग्णालयातून रूग्णांची लूट सुरू आहे. तशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर पाप्त झाल्या. त्यामुळे खासदार धानोरकर यांनी विश्रामगृहात बैठक घेतली. या बैठकीला मनपा आयुक्त राजेश मोहीते, ज्येष्ठ नेते विनोद दत्रात्रय, मनपाचे वैदकीय अधिकारी अविष्कार खंडारे, जिल्हाध्यक्ष ओबीसी कमेटी उमाकांत धांडे यांची उपस्थिती होती. खासगी रुग्णालयावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकाने प्रामाणिकपणे काम करावे. खासगी रुग्णालये रुग्णांना जी बिले देत आहेत. त्याची तपासणी करावी. जास्त बिल कुणी देत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना खासदारांनी अधिकारयांना दिल्या. एका दिवसांत लुटीच्या या प्रकरणाचे चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. 







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top