Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: युवा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या युवांची व संस्थांची
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माहिती सादर करण्याचे क्रीडा विभागाचे आवाहन श्रावण कुमार - प्रतिनिधी चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील युवक व युवा संस्था यांनी मागील 5 वर्षात ...

  • माहिती सादर करण्याचे क्रीडा विभागाचे आवाहन
श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -

चंद्रपूर जिल्ह्यातील युवक व युवा संस्था यांनी मागील 5 वर्षात वर्षनिहाय केलेल्या ठळक व उल्लेखनीय कार्याची संक्षिप्त माहिती, कोविड-19 बाबत केलेले उल्लेखनीय कार्य व शासनाच्या योजना राबविण्याबाबत त्यांचा सहभाग असल्यास त्याबाबतची माहिती दि.13 ऑक्टोंबर 2020 पर्यंत सादर करावी, तसेच अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुस्ताक यांनी केली आहे

क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा. पुणे अंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे युवा तसेच प्रत्येक जिल्ह्यात कार्य करणाऱ्या युवकांचे कार्य फक्त त्या ठराविक जिल्हा पुरते मर्यादित न राहता त्यांच्या कार्याची माहिती सर्वांना अवगत होणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यामध्ये युवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवांचे कार्य अधिकाधिक प्रकाशात आणण्याकरीता त्यांना रेडिओ, एफएम, सह्याद्री वाहिनीद्वारा मुलाखतीतुन प्रोत्साहन  देण्याची गरज आहे. तरी युवा क्षेत्रात युवांशी निगडीत केलेले कार्य, समाज उपयोगी केलेले कार्य, संकटसमयी केलेल्या उपाययोजना, बेटी पढाव, बेटी बचाव, कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून तसेच इतर मार्गाने केलेले कार्य, आरोग्यासंदर्भात केलेले कार्य, शिक्षण क्षेत्राशी निगडीत केलेले कार्य, सामाजिक क्षेत्राविषयी केलेले कार्य इ. अनुषंगिक कार्यात नावलौकीक मिळविलेल्या युवांची  व युवा संस्थांची त्यांनी केलेल्या ठळक व उल्लेखनिय कार्यासह संपूर्ण माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत मागविण्यात आलेली आहे. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top