- माजी आमदार एड.संजय धोटे यांच्या नेतृत्वात भारतीय सिमेंट मजदूर संघातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनातून मागणी
मुरली सिमेंट कंपनी ही सन २०१५ मध्ये बंद झाली होती, त्यानंतर सन २०२० मध्ये कंपनी सुरू झाली असून, जेव्हा कंपनी बंद झाली तेव्हा स्थायी व कंत्राटी असे एकूण ९४७ कामगार होते. आता कंपनी पूर्ववत सुरु झाल्यावर सर्व कामगारांना पूर्ववत कंपनी मध्ये रोजगार मिळेल अशी आशा निर्माण झालेली आहे.
कंपनीत कार्यरत असलेले जुने ३०६ स्थायी कामगार व बाकी कंत्राटी कामगार होते, त्यांना पूर्ववत त्याच विभागात कामावर समाविष्ठ करून घ्यावे तसेच नवीन स्थानिक कामगारांनाच कामावर घेण्यात यावे अशी मागणी यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
सदर प्रकरणावर केंद्रीय साहाय्यक कामगार आयुक्त व कंपनी प्रशासन आणि भारतीय सिमेंट मजदूर संघ यांची संयुक्त बैठक लावून सदर विषयांवर सविस्तर चर्चा करून मार्ग काढू असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले. यावेळी भारतीय मजदूर सिमेंट संघातर्फे रामरूप कश्यप, सत्यवान चामाटे, राजू गोहणे, संजय चहानकर, अजय खामनकर, अजय तिखट उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.