- मृतकाच्या मुलाला डेली वेज स्वरूपात रोजगार देण्याचे आश्वासन
- खांबाडा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
- वाघाचा बंदोबस्त करण्याची शिवसेनेची मागणी
राजुरा -
राजुरा तालुक्यात वाघाची दहशत सुरूच आहे. ५ ऑक्टॉबरला खांबाडा येथील एका शेतकऱ्याला वाघाने हल्ला करून जागीच ठार करून त्याचा शरीराचे तुकडे तुकडे केले. मृत शेतकऱ्याचा ७० टक्के भाग वाघाने फस्त केला. तालुक्यात आज पर्यंत झालेल्या वाघाच्या हल्यात हा हल्ला अंगावर शहारे आणणारा होता. या अत्यंत दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच राजुरा शिवसेनेचे पदाधिकारी बबनराव उरकुडे, राजू डोहे, निलेश गंपावार, उमेश गोरे, बाळू कुईथे यांनी वन अधिकारी विदेशकुमार गलगट यांच्याशी चर्चा करून पीडित कुटुंबाला अंत्यविधीसाठी 1 लाख रोख रक्कम आणि मुलगा देवानंद मारोती पेंदोर 33 याला वनविभागाच्या माध्यमातून रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले.
वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत दहा लोकांचा बळी गेला असून आता या वाघाला ठार केल्याशिवाय लोकांचे जगणे अशक्य होणार असल्याने आता वनविभागाने ह्या वाघाला त्वरित मारावे अशी मागणी बबनराव उरकुडे, राजू डोहे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.