शैलेश कोरांगे - प्रतिनिधी
कोरपना -
राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या वाढदिवसा निमित्त वनसडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरात 15 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोना संकट व शासकीय रक्तपेढीत रक्ताची कमतरता व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत वनसडी येथे युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, काँग्रेस कमेटी वनसडी च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रक्तदान शिबिराला वनसडीच्या सरपंच तथा कोरपना तालुका महिला काँग्रेसच्या कमेटीच्या अध्यक्षा ललिता गेडाम, उपसरपंच सुधाकरराव पिंपळकर, जेष्ठ नेते राजाबाबू गलगट, ग्राम पंचायत सदस्य भास्कर जोगी, सामाजिक कार्यकर्ते सुधाकरराव आस्वले, इरफान शेख, तिरुपती कन्नाके उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेकरिता राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे महासचिव रोशन आस्वले, मारोती शेरकी, अशोक आस्वले, संदीप थेरे यांनी परिश्रम घेतले.








टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.