Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे केंद्रीय स्वास्थ्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना चंद्रपूर शासकीय महाविद्यालय व सिकलसेल सॅटेलाईट सेंटर ला भेट देण्याचे निमंत्रण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
श्रावण कुमार - प्रतिनिधी चंद्रपूर - ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या चंद्रपूर ची ओळख आज वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा उल्लेखनीय झाली आहे. कोविड संकटात चं...

श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -

ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या चंद्रपूर ची ओळख आज वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा उल्लेखनीय झाली आहे. कोविड संकटात चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सिकलसेल सॅटेलाईट सेंटर ची भूमिका महत्वपूर्ण असून या दोन्ही संस्थांना भेट देण्याचे निमंत्रण पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय स्वास्थ्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना नवी दिल्ली येथे केली आहे. या भेटीदरम्यान हंसराज अहीर यांच्यासोबत एम्स नवी दिल्ली चे पूर्व डीन तथा आयसीएमआर चे वैज्ञानिक प्रोफे. एन.के. मेहरा हे सुद्धा उपस्थित होते.

देशात अस्थिमज्जा (Bone Marrow) नोंदणी (बँक) चे कार्य वर्ष २०१४ पासून सुरु असून या कार्याला गती देण्याची विनंतीही यावेळी हंसराज अहीर मंत्री महोदयांना केली आहे. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top