Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चिमूर येथील सर्व दुकाने सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंतच राहणार सुरू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शनिवार व रविवार ला कडकडीत बंद आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापारी संघटना चिमूर यांनी घेतला निर्णय मनोज सोगलकर - विशेष प...

  • शनिवार व रविवार ला कडकडीत बंद
  • आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापारी संघटना चिमूर यांनी घेतला निर्णय
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चिमूर -
चिमूर तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत असलेल्या संख्येमुळे व वाढत असलेल्या  प्रदूर्भावर नियंत्रण यावे म्हणुन चिमूर येथील शहीद बालाजी रायपूरकर सभागृह येथे कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये चिमूर व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांचेशी चर्चा करून चिमूर येथील वैद्यकीय सेवा सोडुन सर्व दुकाने हे सकाळी ९ ते सुपारी २ वाजेपर्यंतच सुरू राहतील व शुक्रवार, शनिवार व रविवारी सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात येणार असा निर्णय घेण्यात आला. सदर निर्णय दिनांक १५/०९/२०२० पासून लागू होणार आहे.

या बैठकीला चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया, चिमूर येथील उपविभागीय अधिकारी संपकाळ, तहसीलदार नागतीळक, ठाणेदार धुळे, संवर्ग विकास अधिकारी संजय पुरी, चिमूर नगर परिषद नगराध्यक्ष गोपाल झाडे, डॉ.अगडे, चिमूर व्यापारी संघटना अध्यक्ष प्रमोद बारापत्रे उपस्थित होते. 



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top