Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सराईत गुन्हेगाराकडून देशी कट्टा व जिवंत काडतूस जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. 13 जुलै 2026) -         राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धडा...
राजुरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. 13 जुलै 2026) -
        राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराकडून गावठी बनावटीचा देशी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई 12 जुलै 2026 रोजी रामनगर सास्ती येथील कोलगाव रोडवरील राममंदिर परिसरात करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस उपनिरीक्षक तथा डी.बी. प्रमुख लक्ष्मण लोकरे व गुन्हे शोध पथक अवैध धंद्यांवर कारवाईसाठी परिसरात गस्त घालत असताना खास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रामनगर सास्ती येथील कोलगाव रोडवरील राममंदिर परिसरात एक इसम अग्निशस्त्र बाळगून फिरत आहे.

        या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव श्रीराज संग्राम बहुरीया (वय 21 वर्षे), रा. सरदार पटेल वार्ड, बल्लारशाह असे सांगितले. त्यानंतर आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला पॅन्टच्या आत प्लास्टिकच्या पिशवीत लपवून ठेवलेला एक लोखंडी गावठी बनावटीचा सिंगल बॅरल देशी कट्टा व एक जिवंत काडतूस आढळून आले.
        जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 10 हजार रुपये किमतीचा लोखंडी गावठी बनावटीचा सिंगल बॅरल देशी कट्टा असून त्याच्या हँडग्रीपला लाल व काळ्या रंगाचे कापड गुंडाळलेले होते. तसेच 500 रुपये किमतीचे 'KF 12' असे अंकित असलेले एक पिवळ्या धातूचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. एकूण 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

        प्राथमिक तपासात आरोपी श्रीराज संग्राम बहुरीया हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो कोणताही दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे देशी कट्टा व जिवंत काडतूस जवळ बाळगून फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी भारतीय हत्यार कायद्यान्वये कलम 3 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

        ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण लोकरे, सहाय्यक फौजदार किशोर तुमराम, पोलीस हवालदार विक्की निर्वाण, पोलीस हवालदार अनुप डांगे, पोलीस अंमलदार शफीक शेख, महेश बोलगोडवार आणि रमेश बस्सी यांनी सहभाग घेतला.

#RajuraPolice #ChandrapurPolice #Rajura #Ballarshah #CrimeNews #MaharashtraPolice #IllegalWeapon #DesiKatta #ArmsAct #CrimeUpdate #BreakingNews #ChandrapurNews #VidarbhaNews #PoliceAction #LocalNews #MaharashtraNews #RajuraCrime #BallarshahNews #Vidarbha #AamchaVidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top