- गेल्या 24 तासात 200 बाधित
- उपचार सुरु असणारे बाधित 2575
- बाधितांची एकूण संख्या 6058
- चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 3405 बाधितांना डिस्चार्ज
- वाचा सविस्तर बातमी...
24 तासात प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 7 कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे.यामध्ये बालाजी मंदीर परिसर चंद्रपूर येथील 60 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
दुसरा मृत्यू शंकरपूर चिमुर येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. 12 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 12 सप्टेंबरला रात्री बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह उच्चरक्तदाब व मधूमेह होता.
तिसरा मृत्यू बाबुपेठ चंद्रपूर येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 27 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 13 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
चवथा मृत्यू बल्लारपूर येथील 32वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 8 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 13 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
पाचवा मृत्यु वाघोली ता. सावली येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 1 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 13 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
सहावा मृत्यू बल्लारपूर येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 10 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 13 सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
तर, सातवा मृत्यू भीवापूर वार्ड चंद्रपूर येथील 68 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 13 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
जिल्हयात आतापर्यंत 78 बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्हयातील 71, तेलंगाना एक, बुलडाणा एक, गडचिरोली दोन, आणि यवतमाळ तिन बाधितांचा समावेश आहे.
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 139, कोरपना तालुक्यातील 5, नागभीड तालुक्यातील 5, बल्लारपूर तालुक्यातील 14, भद्रावती तालुक्यातील 8, मूल तालुक्यातील 10, राजुरा तालुक्यातील 4, वरोरा तालुक्यातील 4, सावली तालुक्यातील 2, सिंदेवाही तालुक्यातील 8, गडचिरोली येथील एक असे एकूण 200 बाधित पुढे आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.