अंतरगाव बु मध्ये सामुहिक संसर्गाची लक्षणे दिसत असल्याने कोरोनाचा अंतरगाव मध्ये केव्हाही उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी ग्राम पंचायत अंतरगाव बु ने 15 सप्टेंबर मंगळवार ते 17 सप्टेंबर गुरुवार पर्यंत जनता जनता कर्फ्यू चे आव्हान केले आहे.
ग्राम पंचायत अंतरगाव बु चे सरपंच सरिता पोडे, ग्राम सचिव प्रशांत टाटेवार, आरोग्य परिचारिका ढवस मॅडम, पोलिस पटिल आनंदराव मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पार पडलेल्या बैठकीत व्यापारी तथा प्रतिष्ठित नागरिक यांच्या सहमतीने जनता कर्फ्यू चा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपस्थित अंतरगावचे सरपंच सरिता नितीन पोडे, उपसरपंच श्यामकलाताई पिंपळशेंडे, ग्राम पंचायत सदस्य ग्राम पंचायत सचिव प्रशांत टाटेवर, पोलिस पटिल आनंदराव मडावी, तंटा मुक्ती अध्यक्ष सुरेश कळसकर, आरोग्य परिचारिका ढवस मॅडम, झाडे मैडम, माजी उपसरपंच आशीष मुसळे, बंडू वडस्कर, बाळा वड्स्कर, बंडू खेलूरकर, गजानन मोरे, प्रतिष्ठित व्यापारी रविकांत गजानन बोबडे, मंगेश वड्स्कर, संतोष पिंपळकर व युथ एजन्सी सर्विस चे अध्यक्ष अमोल कळसकर व त्यांची संपूर्ण टीम उपस्थिती होती.



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.