Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: परसोडा फाटा येथे ट्रक - मॅक्स चा भीषण अपघात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
एक ठार, पाच गंभीर रित्या जखमी कोरपना - आदिलाबाद महामार्ग वरील घटना शैलेश कोरांगे - प्रतिनिधी कोरपना - कोरपना कडून आदिलाबाद कडे जाणाऱ्या ट्रक...

  • एक ठार, पाच गंभीर रित्या जखमी
  • कोरपना - आदिलाबाद महामार्ग वरील घटना

शैलेश कोरांगे - प्रतिनिधी
कोरपना -
कोरपना कडून आदिलाबाद कडे जाणाऱ्या ट्रक व विरुद्ध दिशेने येणाऱ्या मॅक्स या दोन्ही वाहनाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात घडला. यामध्ये एकाचा मृत्यू तर पाच जण गंभीर रित्या जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजता च्या दरम्यान कोरपना - आदिलाबाद महामार्ग वरील परसोडा फाट्यावर घडली.

प्राप्त माहितीनुसार, कोरपना कडून आदिलाबाद कडे जाणाऱ्या ट्रक क्र एपी १ एक्स ७२७२ चा टायर फुटल्याने त्याचे वाहन वरचे नियंत्रण सुटले. तसेच समोरून येणाऱ्या मॅक्स क्र एम एच ३४ के १५०३ चेही नियंत्रण सुटले गेले. यात मॅक्स वाहनातील चालक शफी शेख , शेख कालू ३२ रा.कोरपना हा जागीच मृत पावला. तर नागेश त्रिलोक सहारे ३५, सुवर्णा नागेश सहारे ३०, नरेश त्रिलोक साहारे ३०, नयन नागेश सहारे ९ सर्व राहणार रामनगर आदीलाबाद, विशाल नागोराव गावंडे ३२ रा.पारडी हे पाच गंभीररीत्या जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना उपचारासाठी कोरपना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जखमींची स्थिती गंभीर असल्याने चंद्रपूरला रेफर करण्यात आले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अरुण गुरनुले यांचे मार्गदर्शनाखाली कोरपना पोलिस करीत आहे.



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top