चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे दालनात बैठक आयोजीत करून त्या १४ गावांबाबत असलेली समस्या अवगत करून दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा व कोरपना या तालुक्याची पुनर्रचना करून जिवती तालुक्याची निर्मिती करण्यात आली त्यावेळेस या १४ गावांचे नावे महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात उल्लेख आहे. याचाच अर्थ सदर गावे हि चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील असून महाराष्ट्राचीच आहे हि बाब वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली. सन १९६९ मध्ये वन परिक्षेत्र वनसडी यांनी या १४ हि गावांना चराई करीता जागा दिलेली होती.
हि गावे महाराष्ट्राच्या हद्दीत असुन वन विभागाने कोणत्याही परिस्थितीत आपला ताबा सोडू नये असे निर्देश मध्य चांदा वनविभाग चंद्रपूरचे उपवनसंरक्षक यांना दिले. या प्रसंगी बैठकीला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वनविभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंडे, उपविभागीय अधिकारी जे. पि. लोंढे, उपविभागीय वनअधिकारी प्रितमशिंग कोडापे, जिवती वनपरिक्षेत्र अधिकारी कुमारी योगिता मडावी, जिवती तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गणपत आडे, प्रा. सुग्रीव गोतावडे, मुकदमगुडाचे रामदास रणवीर आदी उपस्थितीत होते.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.