Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: उमेद अभियाना अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेत पुनर्नियुक्ती द्यावी - आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी राजुरा - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियाना (उमेद) ग्रामीण भागातील महीलांच्या सक्षमिकरण आर्थिक, सामा...

अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियाना (उमेद) ग्रामीण भागातील महीलांच्या सक्षमिकरण आर्थिक, सामाजिक व राजकीय जीवन बदलाचे प्रतीक आहे. या अभियाना  अंतर्गत महाराष्ट्र राज्यात एकुण ५ लाखांच्यावर महिला गटाची व ५० लक्ष कुटुंबांचा यात समावेश आहे. अभियानाच्या यशस्वीतेसाठी समर्पित भावनेने काम करणारी यंत्रणा उभी झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात उमेद अभियानाच्या माध्यमातून जवळपास १७५०० गटाची व ९९३ ग्रामसंघाची निर्मिती झाली आहे. प्रभागसंघ बांधणीचे काम प्रगती प्रथावर आहे. त्यामुळे उमेद अभियाना अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांना सेवेत पुनर्नियुक्ती द्यावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनव्दारे केली आहे. 

उमेद अभियानातील अधिकारी व कर्मचारी यांना कोणतीही पूर्वसूचना न देता या अभियानातील मोठया प्रमाणावर कर्मचारी कमी केल्यास अभियानाच्या उद्दीष्टपूर्तीवर गंभीर परिणाम होणार आहे. अभियांनातील कर्मचारी बेरोजगार होऊन त्यांचे कुटुंबियांचे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

उमेद अभियानातील कंत्राटी कर्मचारी यांना त्यांच्या सेवेत पुनर्नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी उमेद कर्मचारी कल्याण मंडळ चंद्रपूर या संघटनेनी केली आहे. याची दखल घेत राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण जैन यांचेकडे उमेद अभियानातील कर्मचारी यांना शासनाचा धोरणात्मक निर्णय होई पर्यंत सेवेतुन कमी करण्यात येऊ नये व अभियानातील कर्मचाऱ्यांना सेवेत पुनर्नियुक्ती देण्यात यावी हि मागणी निवेदनव्दारे केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top