- शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी ; तहसीलदारांना निवेदन
कोरपना -
बुधवारी सकाळी झालेल्या अति मुसळधार वादळी वाऱ्यासह पावसामुळे कोरपना तालुक्यातील शेकडो एकर वरील पिके भुईसपाट झाली. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे.
तालुक्यातील कोरपना, कातलाबोडी, कुकुडबोडी , बोरगाव, कुसळ, कन्हाळगाव, धोपटाळा आदी गावातील शेत शिवारात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने कापूस , तूर पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी वर्ग नैसर्गिक संकटात अडकला गेला आहे. जवळपास तीनशे एकर वरील शेतजमिनीवर हे नुकसान झाल्याने एन्ह हंगामावर हाथी आलेला घास शेतकऱ्यांकडून हिरावला गेला आहे. आधीच शेतकरी विविध अडचणी नी ग्रासला असताना शेतकऱ्यावर हे अस्मानी संकट कोसळले गेले. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून ठोस मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. या अनुषंगाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कोरपना चे नायब तहसिलदार यांना निवेदन दिले आहे.
कोरपना तालुक्यातील शेतशिवारात झालेल्या अति पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात मोका चौकशी व पाहणी करण्याचे निर्देश संबंधित तलाठी यांना देण्यात आले आहे. यासंदर्भातला अहवाल आमच्या वतीने वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात येणार आहे.
प्रवीण चिडे
नायब तहसीलदार, कोरपना

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.