- विद्यार्थी व पालकाची मागणी ; शैक्षणिक दृष्ट्या होतेय गैरसोय
कोरपना या ठिकाणी विज्ञान व वाणिज्य विद्याशाखेचे उच्च माध्यमिक, पदवी व पदव्युत्तर महाविद्यालय नसल्याने कोरपना शहरासह परिसरातील १२० गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतरत्र ठिकाणी जावे लागत आहे. यात वेळ व आर्थिक बाब मोठ्या प्रमाणात खर्ची पडत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो आहे. कोरपना हे तालुक्याचे ठिकाण असल्याने या परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी मोठ्या संख्येने येतात. परंतु येथे कला विद्याशाखा व्यतिरिक्त अन्य शाखांचे अभ्यासक्रमच उपलब्ध नाही.तसेच सद्यस्थितीत शासनाने नवीन महाविद्यालयांना अनुदान देणे बंद केल्यामुळे या विद्याशाखा येथे सुरू करण्यास कुणीही पुढे येत नाही. त्यामुळे येथे शासनानेच विज्ञान व वाणिज्य विद्याशाखेचे उच्च माध्यमिक, पदवी व पदव्युत्तर महाविद्यालय सुरू केल्यास येथील विद्यार्थ्यांची गैरसोय ही दूर होईल. तसेच या आदिवासी बहुल, अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दृष्ट्या सर्वांगिन विकास साधला जाईल.

अत्यंत गरजेचे आहे.
उत्तर द्याहटवा