Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पंस कृषी अधिकारी घनश्याम पसारे ग्राम पंचायत हिरापुर चे प्रशासक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी चिमूर - चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या हिरापुर ग्राम पंचायत चे प्रशासक म्हणून चिमूर पंचायत समिती चे क...


मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चिमूर -
चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या हिरापुर ग्राम पंचायत चे प्रशासक म्हणून चिमूर पंचायत समिती चे कृषी अधिकारी घनश्याम पसारे यांनी मंगळवार ला आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. 

राज्यातील अनेक ग्रामपंचायतची मुदत संपली आहे. कोरोनामुळे सध्या ग्राम पंचायत निवडणूका होणे शक्य नसल्याने राज्य सरकारने निवडणुका सहा महिने पुढे धकळल्या आहेत. गावातील कारभार सुरळीत चालावा यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रशासक म्हणून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर केली आहे.

माजी सरपंच विलास बघिले यांनी हिरापुर ग्राम पंचायत पदाचा प्रभार संभाळला असून त्यांच्या काळात अनेक विकास कामे पूर्ण झालीत, त्यांनी अत्यंत कर्तव्यदक्षतेनी आपला प्रभार सांभाळला त्यामुळे ग्राम पंचायत पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना निरोप देण्यात आला. 

कृषी अधिकारी घनश्याम पसारे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच विलास बघिले, ग्रामसेवक किरण गायकवाड, मनोज सोगलकर, अतुल बावनकर, रोशन बावनकर, पिंटू बावनकर ग्रा.पं.शिपाई शंकर ढोक ई. उपस्थित होते. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top