Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राज्‍यातील नगरपालिकांच्‍या मुख्याधिकाऱ्यांना देण्‍यात आलेल्‍या खर्चाच्‍या अधिकारात दुप्‍पट वाढ करण्‍याचा शासनाचा निर्णय
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
14 सप्टेंबर रोजी नगरविकास विभागाचा शासन निर्णय निर्गमित आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पाठपुराव्‍याचे फलीत मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी चिमूर...

  • 14 सप्टेंबर रोजी नगरविकास विभागाचा शासन निर्णय निर्गमित
  • आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पाठपुराव्‍याचे फलीत

मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चिमूर -
कोविड संदर्भात प्रतिबंधात्‍मक आणि उपचारात्‍मक उपाययोजनांसाठी राज्‍यातील नगरपालिकांच्‍या मुख्याधिकाऱ्यांना देण्‍यात आलेल्‍या खर्चाच्‍या अधिकारात दुप्‍पट वाढ करण्‍यात आली असून दिनांक 14 सप्‍टेंबर 2020 रोजी नगरविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. राज्‍याचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासन स्‍तरावर केलेल्‍या पत्रव्‍यवहाराच्‍या व पाठपुराव्‍याच्‍या अनुषंगाने राज्‍य शासनाने हा निर्णय घेतला आहे.

नगरविकास विभागाच्‍या नगरविकास विभागाच्‍या दिनांक 28 मार्च 2020 रोजीच्‍या पत्रानुसार कोविड 19 प्रतिबंधात्‍मक आणि उपचारात्‍मक उपाययोजनांसाठील राज्‍यातील क वर्ग नगरपालिकांना रू. 5 लक्ष, ब वर्ग नगरपालिकांना रू. 10 लक्ष व अ वर्ग नगरपालिकांना 15 लक्षापर्यंत निधीला प्रशासकीय मान्‍यता देण्‍याचे व निधी खर्च करण्‍याचे अधिकारी संबंधित नगरपालिका मुख्‍याधिका-यांना देण्‍यात आले होते. कोविड 19 ची परिस्‍थीती अतिशय गंभीर होत चालली असून रूग्‍णसंख्‍येत लक्षणीय वाढ होत चालली आहे. नगरपरिषदांच्‍या उत्‍पन्‍नाचे स्‍त्रोत मर्यादीत आहेत. कोविडमुळे मालमत्‍ता कराची अपेक्षित वसुली होत नाही, नगरपरिषदांना स्‍वनिधी उपलब्‍ध नसल्‍याने परिस्‍थीती गंभीर होत चालली आहे. राज्‍यातील अनेक नगरपरिषदांकडे 14 व्‍या वित्‍त आयोगाअंतर्गत निधी अखर्चीत आहे. या निधी अंतर्गत नगरपालिका मुख्‍याधिका-यांना प्रशासकीय मान्‍यता व खर्चाबाबत जे अधिकार देण्‍यात आले आहेत त्‍या निधीत दुपटीने वाढ करण्‍यात यावी अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी  मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्‍याकडे केली व त्‍यासाठी पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला. त्‍यांच्‍या या प्रयत्‍नांना यश प्राप्‍त झाले असून दिनांक 14 सप्‍टेंबर 2020 रोजीच्‍या शासन निर्णयानुसार शासनाने यात दुपटीने वाढ केली आहे.

आता मुख्‍याधिकारी अ वर्ग नगर परिषद यांना रू. 30 लक्ष, मुख्‍याधिकारी ब वर्ग नगर परिषद यांना रू. 20 लक्ष, मुख्‍याधिकारी क वर्ग नगर परिषद तसेच नगरपंचायतींना रू. 10 लक्ष या मर्यादेत प्रशासकीय मान्‍यता देण्‍याचे अधिकार देण्‍यात आले आहे. या निधीच्‍या माध्‍यमातुन कोविड-19 प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांमध्‍ये कन्‍टेंमेंट झोन घोषित करणे व कन्‍टेंमेंट झोनचे व्‍यवस्‍थापन करणे, कोविड केअर सेंटरचे व्‍यवस्‍थापन करणे, कोविड उपाययोजनांच्‍या अनुषंगाने अशा मृतदेहांवर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यासाठी लागणा-या सर्व उपाययोजनांवर होणारा खर्च देखील सर्वसाधारपणे समाविष्‍ट आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने नगर परिषद क्षेत्रातील कोरोना नियंत्रणाच्‍या प्रक्रियेला अधिक बळ प्राप्‍त झाले आहे.




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top