Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूर जिल्‍हयातील अवैध व्‍यवसायांची सीबीआय च्‍या माध्‍यमातुन चौकशी करावी – भाजपाची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
देवराव भोंगळे यांच्‍या नेतृत्‍वात शिष्‍टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी  चंद्रपूर - चंद्रपूर जिल्‍हयातील...

  • देवराव भोंगळे यांच्‍या नेतृत्‍वात शिष्‍टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी 
चंद्रपूर -
चंद्रपूर जिल्‍हयातील माफीयाराज तातडीने थांबविण्‍याच्‍या दृष्‍टीने जिल्‍हयातील अवैध व्‍यवसायांची सीबीआय च्‍या माध्‍यमातुन चौकशी करण्‍याची मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्‍यात आली आहे. भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांच्‍या नेतृत्‍वात एका शिष्‍टमंडळाने जिल्‍हाधिकारी अजय गुल्हाने यांची  भेट घेत सदर निवेदन सादर केले.
या निवेदनाद्वारे भाजपातर्फे करण्‍यात आलेल्‍या मागणी पत्रात म्‍हटले आहे की, चंद्रपूर जिल्‍हयात मोठया प्रमाणावर अवैध व्‍यवसाय सुरू आहे. यावर शासन व प्रशासनाचा कोणताही प्रतिबंध नाही. वाळू तस्‍करी, दारू तस्‍करी, गँगवॉर अशा घटना सातत्‍याने जिल्‍हयात घडत आहेत. यात तस्‍करांसह अनेक तथाकथीत मोठी माणसे सहभागी आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. जिल्‍हयात दारू तस्‍करीला, अवैध दारूविक्रीला ऊत आला आहे. अवैध दारूविक्री करणा-यांचे गंभीर प्रकारचे संभाषण अर्थात त्‍या संभाषणाची ध्‍वनीफीत सध्‍या समाज माध्‍यमांवर मोठया प्रमाणावर व्‍हायरल होत आहे. ही ध्‍वनीफीत ऐकल्‍यानंतर अवैध दारूविक्रीला राजकीय वरदहस्‍त असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. वाळू तस्‍करीची प्रकरणे सुध्‍दा मोठया प्रमाणावर जिल्‍हयात सुरू आहेत. गँगवॉर च्‍या माध्‍यमातुन होणारे खून ही तर नित्‍याची बाब झाली आहे. चंद्रपूर जिल्‍हयात माफीयाराज अवतरल्‍याची परिस्‍थीती निर्माण झाली आहे. या सर्व अवैध व्‍यवसायांची सखोल चौकशी सीबीआय च्‍या माध्‍यमातुन होण्‍याची व माफीयाराज थांबविण्‍याची नितांत आवश्‍यकता असल्‍याचे भाजपाने निवेदनात म्‍हटले आहे.
सदर शिष्‍टमंडळात देवराव भोंगळे यांच्‍यासह जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, भाजयुमो महानगर अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, जिल्‍हा परिषद सदस्‍य ब्रिजभूषण पाझारे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. 



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top