- धनकदेवी-कारगाव येथे मलेरिया-डेंगू तापाने दोघांचा मृत्यू
- आरोग्य विभाग गाढ झोपेत
जिवती -
जिवती तालुक्यातील अतिदुर्गम कोलाम आदिवासी जमातीचे धनकदेवी, कारगाव (खुर्द) या गावात मलेरिया डेंगू आजाराने गावकरी त्रस्त झाले असून पंधरा दिवसापूर्वी त्रस्त नागरिकांनी आजाराची कल्पना गटविकास अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली होती मात्र आवश्यक ती उपाययोजना, रक्त तपासणी, फवारणी, उपचाराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कोलाम समाज वस्तीतील 4 वर्षे वयाची कनीबाई तर कारगाव (खुर्द) येथील सहाव्या वर्गाची विद्यार्थिनी लक्ष्मी मडावी वय बारा वर्ष ह्या मुलींचा गेल्या आठवड्यात डेंगू-मलेरिया आजारामुळे मृत्यू झाला. धनकदेवी येथील लालीबाई आत्राम, रमेश आत्राम हे अत्यंत मृत्यूशी झुंज देत आहे. ह्यांना ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे भरती करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक असल्याने चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. साथीच्या रोगामुळे गावामध्ये चिंतेचे वातावरण असून गावभर आजाराने अनेक रुग्ण त्रस्त आहे. जिवती तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा धीसाळ कारभारामुळे डोंगर पायथ्याशी असलेल्या या गावाकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या एक आठवड्यापासून एकही आरोग्य कर्मचारी या गावाला फिरकला नाही. या ठिकाणी तातडीने आरोग्य तपासणी शिबिर, रक्त तपासणी व फवारणी उपक्रम राबविण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे. 17 तारखेला भ्रमणध्वनीवर संबंधित अधिकाऱ्यांकडे संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मोबाईल स्विच ऑफ-संपर्क क्षेत्राचा बाहेर असल्याने संपर्क होऊ शकला नाही. धनकदेवी, कारगाव खुर्द येथे तातडीने उपचाराची व्यवस्था करावी. उपचाराअभावी कोणत्याही कोलाम आदिवासींचा उपचारा अभावी मृत्यू होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली यांनी केली असुन ग्रामीण रुग्णालय येथे भेट देऊन रुग्णांशी विचारपुस केली. लालीबाई व रमेश यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. मात्र गावात दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. अत्यंत गरीब कुंटूब असल्याने, आर्थिक बाजू कमजोर असल्याने खाजगी दवाखान्यात उपचार करणे यांना शक्य नाही. अशी माहिती आबिद अली यांनी दिली आहे.










टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.