- मा.पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त मौजा कोंढाळा येथे रक्तदान शिबिर
- कोरोना योध्याचा सत्कार व वृक्षारोपण संपन्न
- भारतीय जनता पार्टी कोंढाळा च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
देशाचे मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा ७० वा वाढदिवस संपूर्ण देशभरात साजरा होत असून देसाईगंज तालुक्यातील मौजा कोंढाळा येथील ग्रामपंचायत येथील सभागृहात साजरा करण्यात आले आहे. त्या अंतर्गत रक्तदान शिबिर, वृक्षलागवट कोरोना योध्याचा सत्कार करण्यात आले. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. गजबे यांनी आजच्या कठीण प्रसंगात रक्ताची गरज असून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, नगराध्यक्षा शालुताई दंडवते, मोतीलाल कुकरेजा उपाध्यक्ष न प वडसा, सौ. रोशनीताई पारधी महिला व बालकल्याण विकास सभापती जिल्हा परिषद गडचिरोली, सदानंद कूथे जिल्हा संपर्क प्रमुख भाजपा, राजेश जेठानी भाजपा तालुका अध्यक्ष वडसा, सौ रेवताताई अलोने सभापती प स वडसा, शेवंताबाई अवसरे उपसभापती प स वडसा, सुनीलजी पारधी, योगेशजी नाकतोडे माजी सरपंच आमगाव, अर्चना ताई ढोरे प स सदस्य, कुंभलवार ताई पोलीस पाटील कोंढाळा, कैलास जी राणे, नाखातेजी, वसंता दोनाडकर, कैलास पारधी, तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी गावकरी व युवक उपस्थिती होते.











टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.