- पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनी मुल भाजपने तालुक्यात पाळला सेवा दिन
चंद्रपूर -
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, युगपुरुष, नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांचेवतीने राज्यात सेवा सप्ताह पाळला जात असून त्यामाध्यमातुन विविधांगी कार्यक्रम, उपक्रमाचे आयोजन केल्या गेले आहे. याचं धर्तीवर भारतीय जनता पार्टी मुल तालुका यांचेवतीने सकाळी तालुक्यातील मारोडा प्रा. आ. केंद्र येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले प्रामुख्याने उपस्थित होत्या. तसेच, मुल पं. स. सभापती चंदू मारगोणवार, उपसभापती घनश्यामजी जुमनाके, पं. स. सदस्या सौ. वर्षा लोनबले, बंडू नर्मलवार, ग्रामप्रशासक प्रधाने, ग्राम विकास अधिकारी भोयर, सचिन गुरनुले, वैद्यकीय अधिकारी डॉ. झाडे, डॉ. भांडेकर यांसह आदी मंडळी उपस्थित होते.










टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.