Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आनंदवनातून झाला सेवा सप्ताह चा शुभारंभ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या जन्मदिनाचे औचित्य बाबांच्या एकलव्यांना मिळाले सुरक्षा कवच आ मुनगंटीवार यांचा पुढाकार महानगर भाजपाचा उपक्रम श्...

  • पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या जन्मदिनाचे औचित्य
  • बाबांच्या एकलव्यांना मिळाले सुरक्षा कवच
  • आ मुनगंटीवार यांचा पुढाकार
  • महानगर भाजपाचा उपक्रम

श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी तर्फे देशात सेवा सप्ताहचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी, महानगर चंद्रपूर तर्फे आनंदवनातील कुष्ठरोगी व दिव्यांगांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेपोरायझर व आर्सेनिक अलबम औषध वाटून सेवा सप्ताहाचा शुभारंभ आज गुरुवार १७ सप्टेंबर ला करण्यात आला. आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ७० वेपोरायझर मशीन व आर्सेनिक अलबम ३० हे औषध उपलब्ध झाल्याने, आनंदवनच्या एकलव्यांना सुरक्षा कवच मिळाल्याची चर्चा आनंदवनात आहे.

या छोटेखानी कार्यक्रमात अध्यक्षस्थानी महारोगी सेवा समितीचे व्यवस्थापक गौतम करजगी यांची तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष  डॉ मंगेश गुलवाडे, महापौर राखी कांचर्लावार, वरोरा नगराध्यक्ष अहतेशाम अली, मनपा नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार, जिप सदस्य ब्रिजभूषण पाझारे, महारोगी सेवा समितीचे विश्वस्त डॉ विजय पोळ, सरपंच सुधाकर कडू, दिव्यांग सेवा समितीचे श्रीराम पान्हेरकर, भाजपा नेते डॉ भगवान गायकवाड, सुरेश महाजन, ओम मांडवकर, विनोद लोहकरे, राजेश साकुरे, प्रकाश दुर्गपुरोहित, प्रशांत विघ्नेश्वर, रामकुमार अकापेलिवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी गौतम करजगी म्हणाले, आनंदवनातही कोरोनाचा प्रवेश झाला आहे. अश्यात आ मुनगंटीवार यांनी वेपोरायझर व आर्सेनिक अलबम पाठवून परत एकदा त्यांनी कर्मयोगी बाबा आमटे व आनंदवन वरील प्रेम व्यक्त केले. निमित्य मोदींजींच्या वाढदिवसाचे असले तरी, आ मुनगंटीवार समाजातील शेवटच्या माणसाला केंद्रस्थानी ठेवून कार्य करतात, कोविड १९ च्या संकटात त्यांची भूमिका पालका सारखीच आहे, असे ते म्हणाले.

यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे व महापौर राखी कांचार्लावार यांचे हस्ते गौतम करजगी, डॉ विजय पोळ व सुधाकर कडू यांचा सिंहावलोकन व सैनिकी शाळा पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. तर मान्यवरांच्या हस्ते सुरेश शिरपूरकर, माया जाजू, हेमा भोयर, लक्ष्मी नखाते, सुनील नखाते, ज्ञानेश्वर कुतरमारे,शरद जुमनाके यांना वेपोरायझर मशीन प्रदान करण्यात आली. उर्वरित ६३ वेपोरायझर महारोगी सेवा समितीचे व्यवस्थापक करजगी यांना सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी डॉ गुलवाडे यांनी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व आ मुनगंटीवार यांच्या सेवा कार्याचा उल्लेख करीत भाजपा सदैव आनंदवन सोबत आहे सांगून कोरोनाच्या संकटात "मीच माझा रक्षक" चा मंत्र स्वीकारण्याचे आवाहन केले.तर महापौर कांचर्लावार यांनी बालपणातील आनंदवन सहलीच्या आठवणींना उजाळा देत सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ पोळ, अहतेशाम अली यांनीही मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रकल्प संयोजक प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले. सुभाष कासंगोट्टूवार यांनी आभार मानले. यावेळी आनंदवनचे प्रा सुहास पोतदार, रवींद्र निलगीटंवार यांची उपस्थिती होती.










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top