Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: JCI राजुरा रॉयल्स द्वारा आदर्श शिक्षकांचा सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी राजुरा - सामाजिक क्षेत्रांमध्ये आघाडीवर कार्य करणारी संस्था JCI राजुरा रॉयल्स द्वारा वर्षभर विविध उल्लेखनीय क...

अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
सामाजिक क्षेत्रांमध्ये आघाडीवर कार्य करणारी संस्था JCI राजुरा रॉयल्स द्वारा वर्षभर विविध उल्लेखनीय कार्यक्रम घेण्यात आले. लॉकडाउन असतानाही १०वी १२वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, विविध कोरोना योद्धांचे सत्कार, डॉक्टरचे व नर्सेस चे सत्कार, मास्क, सॅनिटायझर व हँड वॉश चे वितरण, पोलीस व शेतकऱ्यांचे सत्कार, प्लास्टिक निर्मूलन उपक्रम, पाणी वाचवा उपक्रम, विविध मोफत ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम, कौशल्य विकास व इतर अनेक उपक्रम राबविण्यात आले. 

या महिन्यात स्वर्गीय श्यामा कृष्णदत्त शुक्ला यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ के.जे. शुक्ला यांच्या सौजन्याने विविध शैक्षणिक सामाजिक स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ता म्हणून शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी वरकड, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सतीश धोटे, विहीरगांव चे उपसरपंच इरशाद शेख, जिप हायस्कुल चे माजी मुख्याध्यापक गजानन चव्हाण उपस्थित होते. 

यावेळी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे जिप उच्च प्रा.शाळा चनाखा चे सहायक शिक्षक संदीप कोंडेकर, जिप उच्च प्रा.शाळा धानोरा चे शिक्षक इरफान शेख, जिप उच्च प्रा.शाळा नलफडी चे सहायक शिक्षक रामरतन चापले, जिप उच्च प्रा.शाळा मूर्ती चे सहायक शिक्षक मनीष मंगरूळकर, शिवाजी हाईस्कूल गोवरी चे सहायक शिक्षक आनंद चलाख, जिप उच्च प्रा.शाळा शेणगाव चे बाबा कोडापे, आदर्श मराठी हायस्कूल राजुरा चे सहायक शिक्षक बादल बेले, प्रोग्राम कॉर्डिनेटर व शिक्षण प्रेमी अंबुजा सिमेंट फाऊंडेशन उपरवाही ची संगीता मूलकलवार, शिवाजी हायस्कूल राजुरा ची  सहायक  शिक्षिका कृतिका सोनटक्के, जिप उच्च प्रा.शाळा सुमठाणा ची वैशाली विजय भोयर, जिल्हा परिषद हायस्कूल राजुरा चे चंद्रप्रकाश बुटले, जिप उच्च प्रा.शाळा पंचाळा ची शिक्षिका तृप्ती विकास मेंडूलकर, जिल्हा परिषद हायस्कूल विहीरगाव चे माजी मुख्याध्यापक नरेश रामराव बोभाटे, साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय चे मुख्याध्यापक गणेश आबाजी लोहे, नॅशनल ॲथलेटिक्स व स्पोर्ट्स ट्रेनर मेहमूद शेख, जिप उच्च प्रा.शाळा अक्सापुर ची सहायक शिक्षिका सुशीला सत्यनारायण पोरेड्डीवार, एकलव्य रेसिडेंशियल स्कूल देवाडा जाकीर अली, एकलव्य रेसिडेंशियल स्कूल देवाडा रूपा बोरेकर यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

संचालन सुशीला पुरेड्डीवार यांनी तर प्रस्तावना व आभार जिल्हा परिषद हायस्कूल कान्हाळगाव चे शिक्षक स्वतंत्रकुमार शुक्ला यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रॉयलच्या अध्यक्षा सुषमा शुक्ला, रेखा बोढे, सुशीला पुरेड्डीवार व इतर सदस्यांनी सहकार्य केले.






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top