Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपना येथे जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर जाण्याचं टाळलं शैलेश कोरांगे - प्रतिनिधी कोरपना - चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने चंद...

  • नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर जाण्याचं टाळलं
शैलेश कोरांगे - प्रतिनिधी
कोरपना -
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. 25 सप्टेबर ते 1 ऑक्टोंबर पर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. या जनता कर्फ्यूला कोरपन्यातील सर्व व्यापारी व वर्ग यांनी आपले दुकान बंद ठेवून जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला व नागरिकानी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला व कोरपना नगरपंचायत व कोरपना पोलीस स्टेशन यांनी जनता कर्फ्यू यशस्वी होण्यासाठी सर्व कर्मचारी ठिकठिकाणी उभे राहून आपले कार्य करीत आहे.





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top