Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: एम.पी.बिर्ला कंपनीत जमिनी जाणाऱ्या प्रकल्प बधितांना नोकरी द्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ओलित ३० लाख व कोरडवाहू शेतीला २५ लाख एकरी मोबदला देण्याची शेतकरी संघटनेची मागणी अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी राजुरा - यवतमाळ जिल्ह्यातील झ...

  • ओलित ३० लाख व कोरडवाहू शेतीला २५ लाख एकरी मोबदला देण्याची शेतकरी संघटनेची मागणी
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील मुकुटबन येथे होणाऱ्या एम.पी. बिर्ला सिमेंट वर्क्स या कंपनीत चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील परसोडा, नवीन परसोडा, रायपुर, कोठोडा बुद्रुक, कोठोडा खुर्द, गोविंदपुर, पार्डी या गावाच्या शिवेतील जमीन लाईमस्टोन काढण्यासाठी भुअर्जित करण्याचा प्रस्ताव व त्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पबधित शेतकऱ्यांना "एक सातबारा एक नोकरी" आणि भोगावटदार नंबर एक प्रमाणेच भोगवटदार नंबर दोन लाही ओलिताला प्रती एकर ३० लाख व कोरडवाहू ला प्रती एकर २५ लाख रुपये प्रमाणे मोबदला मिळावा तसेच पैनगंगा नदी किनाऱ्यापासूनची सर्व जमीन भुअर्जित करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

कोरपना तालुक्यातील पैनगंगा नदी काठावरील या जमिनी अत्यन्त सुपीक असून या जमिनीत खाली लाईनस्टोनचे प्रचंड मोठे साठे आहेत. या भुअर्जनानंतर शेतीवर अवलंबून असणारे मालक, मजूर व बारा बलुतेदार तसेच या गावातील शेतीवर उपजीविका असणारे सर्व घटक यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न या प्रकल्पामुळे निर्माण होणार आहे. शिवाय या भागातील बहुअंशी शेतकऱ्यांच्या जमिनी या भोगवटदार नंबर 2 असल्यामुळे त्या शेतमालकांना मोबदला मिळताना काही वाटा आपोआपच सरकारकडे जाण्याची कायदेशीर तरतूद आहे. त्यामुळे या भोगवटदार नंबर दोन असणाऱ्या शेतकऱ्यांनाही भोगावटदार नंबर एक असणाऱ्या शेतकऱ्यांप्रमाणेच दोघेही या व्यवसायात समदुःखी असल्यामुळे भोगावटदार नंबर दोन च्या शेतकऱ्यांनाही भोगावटदार नंबर एक च्या शेतकऱ्यांप्रमाणे वाटप होणे गरजेचे आहे. शिवाय भुअर्जित होणाऱ्या जमिनीचे मालक हे मोठ्या प्रमाणावर आदिवासी आहेत आणि भोगावटदार नंबर दोन ला जमीन असल्यामुळे मोबदला वाटपात त्यांच्यावर होणारा अन्याय मोठ्या स्वरूपाचा आहे. त्यामुळे नंबर एक प्रमाणेच भोगवटदार नंबर दोन च्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मोबदला बरोबरीने देणे न्यायोचित आहे.

भुअर्जित केल्या जाणार्‍या ओलिताखालील जमिनीला ३० लाख रुपये एकर व कोरडवाहू जमिनीला २५ लाख रुपये एकर प्रमाणे मोबदला देण्यात यावा व त्याचप्रमाणे भोगवटदार नंबर 2 ची जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनाही त्या दराने मोबदला देण्यात यावा, "एक सात बारा एक नोकरी" याप्रमाणे सर्व प्रकल्पबाधितांना नोकरीत सामावून घेण्यात यावे, काही जमिनी भुअर्जित करताना पैनगंगा नदीच्या किनाऱ्यापासूनच्या सर्व जमिनींचेच भुअर्जन करण्यात यावे व जमीन जाणाऱ्या गावातील स्थानिकांना वेगवेगळ्या विभागात अग्रक्रमाने नोकरी सामान घेण्यात यावे, अशी मागणी एम.पी.बिर्ला सिमेंट व्यवस्थापन, राज्याचे ना. मुख्यमंत्री, उद्योगमंत्री,ना. महसूलमंत्री व जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते, माजी आमदार एड. वामनराव चटप, अरुण पाटील नवले, प्रभाकर दिवे, निळकंठ कोरांगे, एड. श्रीनिवास मुसळे, प्राचार्य अनिल ठाकुरवार, प्रा.जोत्स्नाताई मोहितकर, सौ.पौर्णिमाताई निरंजने, बंडू पाटील राजूरकर, रमाकांत मालेकर, अविनाश मुसळे, सरपंच संजय येरमे, श्रीमती नंदाताई उलमाले, उपसरपंच प्रभाकर आत्राम, भुमन्‍ना चुकाबोटलावार, अनंता गोडे, गुलाब तलांडे, शांताराम मंने, गोविंद मेश्राम, प्रेमलाल भगत, रामलू अण्णा, महादेव ढोके, रामलु कोंकीवार, आनंद बांंदूरकर, महादेव खाडे यांनी दिला आहे.






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top