Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: देशपांडे वाडीत डेंग्यूचे थैमान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्वच्छतेकडे आरोग्य व स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष महिनाभरापासून डास प्रतिबंधात्मक फवारणी नाही नप ने 'बैलांना तुतारी मारल्याशिवास ते कार्य ...

  • स्वच्छतेकडे आरोग्य व स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष
  • महिनाभरापासून डास प्रतिबंधात्मक फवारणी नाही
  • नप ने 'बैलांना तुतारी मारल्याशिवास ते कार्य करीत नाही' असे धोरण सोडावे
वैभव वैद्य - शहर प्रतिनिधी
राजुरा -
कोरोना संकटकाळात राजुरा शहरात डेंग्यूचे थैमान सुरू आहे. मागील महिनाभरापासून शहरांमध्ये वेगवेगळ्या वार्डात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. मात्र स्वच्छतेकडे व डास प्रतिबंधात्मक फवारणीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याने रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली आहे. वार्डातील खुल्या प्लॉटवर असलेले घाणीचे साम्राज्य व सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे अस्वच्छता हे डास पैदास करण्यास कारणीभूत ठरले आहे. वार्डात नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे व फवारणी नसल्यामुळे वार्डात डेंगू ची साथ प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. यात विस्तारित देशपांडे वाडी कडे तर सपशेल दुर्लक्षित असून नगर परिषदेचा आरोग्य व स्वच्छता विभाग अजूनही सुस्त आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरले आहे. स्वच्छतेसाठी नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी वॉर्डातील नागरिकांनी केली आहे. 

मागील काही आठवड्यापासून देशपांडे वाडीत रुग्णांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. या भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. या भागामध्ये खुले प्लाट मोठ्या संख्येने असल्यामुळे घाणीचे साम्राज्य प्रचंड वाढले आहे. स्वच्छतेकडे नगर प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या भागातील नाल्यांची सफाई नियमित होत नाही. पावसाळ्यात डास प्रतिबंधक फवारणी होत नाही. वर्षभरातून एकदाच नाल्यांची सफाई केली जाते. सांडपाण्याचा निचरा नियमित होत नाही. या भागात बांधण्यात आलेले नाली बांधकाम सदोष आहे. विस्तारित देशपांडे वाडीत तर नाल्याचं नाही. त्यामुळे सांडपाणी साचून राहते व घाणीचे साम्राज्य तयार होते. पुरपिडीत क्षेत्र असलेल्या या भागांमध्ये अजूनही मूलभूत सुविधा झालेल्या नाहीत. रस्ते, ओपन स्पेस सौंदर्यीकरण, विद्युत पथदिवे याची प्रतीक्षा अजूनही काही भागांमध्ये आहे. भागातील सांडपाणी वाहून नेणारे नाल्या यांची स्वच्छता नियमित होत नाही. शिवाय डास प्रतिबंधात्मक फवारणी झालेली नाही. नाल्यांच्या बाजूंना प्रचंड प्रमाणात गवत वाढलेले आहे. उघड्या प्लॉटवर घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. शहरातील सांडपाणी वाहून नेणारी मोठी ड्रेनेज याच वॉर्डातून नाल्याकडे जाते. ड्रेनेज पूर्णपणे खुली असल्यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. कुठल्याही प्रकारची फवारणी होत नसल्यामुळे डासांची पैदास प्रचंड वाढली आहे. मागील आठवडाभरापासून देशपांडे वाडीत मोठ्या संख्येने डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत मात्र डेंग्यूच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी व मच्छरांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या प्रभागांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. नाल्या गटारे उघडे आहेत. त्यावर कुठलीही फॉगिंग फवारणी नाही. नाल्यांच्या सभोवताल कचरा वाढलेला आहे. त्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात आहे. यावर आळा घालण्यासाठी  नगरपरिषदेने वार्डात तात्काळ स्वच्छता अभियान राबवावे व डास प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

या भागाचे प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक हे उपनगराध्यक्ष आहेत. तरीही नप च्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे माजी आमदारांचे निवास स्थान परिरस, नप अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान परिसर सोडल्यास उर्वरित देशपांडे वाडीत पूर्णतः दुर्लक्ष आहे. नाल्या कडील विस्तारित देशपांडे वाडीत नप कर्मचारी फक्त मालमत्ता कराचा वसुलीकरिता वर्षातून एकदाच येत असतात. लहान सहान समस्यांकरिता येथील नागरिकांना नगराध्यक्ष विकासपुरुष अरुणभाऊ धोटे व उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ देशपांडे यांना कळवावे लागते. यांना कळविल्यास तात्काळ दखल घेत कार्य होत असले तरी नप प्रशासनाने 'बैलांना तुतारी मारल्याशिवास ते कार्य करीत नाही' असे धोरण सोडण्याची मागणी नागरिक करीत आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top