Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अबब..... चक्क पालक मंत्र्यांची जन्मभूमी गायब
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रवेशद्वारावर मात्र गुड्याचे "फलक" प्रशांत कोसनकर - प्रतिनिधी गोंडपिपरी - राष्ट्रसंताच्या पदस्पर्शाने पावन तंटामुक्त गाव मोहिमेचा...

  • प्रवेशद्वारावर मात्र गुड्याचे "फलक"
प्रशांत कोसनकर - प्रतिनिधी
गोंडपिपरी -
राष्ट्रसंताच्या पदस्पर्शाने पावन तंटामुक्त गाव मोहिमेचा विशेष शांतता पुरस्कार प्राप्त करंजी गावची ओळख "न्यारीच" आहे. प्रेमविवाहाने तर गावचे नाव सातासमुद्रापलिकडे गेले. राज्याचे मदत, पुनर्रवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवारांची जन्मभुमी करंजी आहे. असे असतांना चार हजार लोकवस्तीच्या करंजी गावच्या मुख्य प्रवेशद्वारावर मात्र केवळ चार घरांच्या गुड्याचे फलक लावण्यात आले आहे. यामुळे या मार्गावरुन ये-जा करणारे प्रवासी बुचकाळ्यात पडले आहेत. गावकऱ्यांनी देखील यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली. करंजी गावचा फलकच मुख्य मार्गावर दिसेनासा झाला. यामुळे चक्क मंत्र्याचेच गाव दिसेना ! असे म्हणायची पाळी आली आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील करंजी हे सामाजिक, राजकीयदृष्ट्या पुढारलेले गाव. तालुक्यातील ९८ गावात हे गाव सदैव मुख्य प्रवाहात असते. चार हजार लोकसंख्येच्या करंजी गावालगत महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाने ३५ एकराचा भुखंड १९८० च्या दशकात अधिग्रहित केला. राष्ट्रसंताच्या पदस्पर्शाने पावन या गावाने तंटामुक्त गाव मोहिमेत उल्लेखनीय कार्य करत विशेष शांतता पुरस्कार मिळविला. प्रेमवावाहाची लगभग शंभरी गाठलेल्या करंजी नगरीची ख्याती सातासमुद्रापलीकडे गेली. एवढेच नाही तर राज्याचे मदत, पुनर्रवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची जन्मभुमी करंजी आहे. वडेट्टीवारांचे वडील नामदेवराव वडेट्टीवार करंजीचे सरपंच राहिले. याच दरम्यान वडेट्टीवारांचे बालपण करंजीत गेले. गावच्या मातीशी त्यांची नाती जुळली आहेत. हा ऋणानूबंध वडेट्टीवारांनी कायम ठेवला. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा येताच त्यांनी गावच्या सर्वागीन विकासासाठी पुढाकार घेतला आहे. अश्या एक ना अनेक बाबीने स्वयंपूर्ण असलेल्या करंजी गावच्या प्रवेशद्वारावर मात्र "करंजी" ऐवजी "डूबगोडा" नावाचे फलक लावण्यात आले. डूबगोडा हा केवळ चार घरांचा गुडा आहे. जंगलालगत वसलेल्या या पाड्यावर जाण्यासाठी करंजी गावामधून ३ किलोमिटरचा प्रवास करावा लागतो. बामनी ते नवेगाव (वा.) पर्यंतच्या रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीने काही दिवसांपूर्वी हा बोर्ड करंजीच्या प्रवेशद्वारावर लावला. आणि एकच गोंधळ उडाला. गावकरीही बुचकाड्यात पडले. चंद्रपूर-अहेरी मुख्य मार्गावरुण ये-जा करणाऱ्या नवख्या प्रवाश्यांना आता करंजी गाठण्यासाठी तोंडाची वटवट करावी लागत आहे. ऐकंदरित करंजी गावचा फलकच मुख्य मार्गावर दिसेनासा झाला. यामुळे चक्क पालक मंत्र्याचेच गाव गायब ! असे म्हणायची आता पाळी आली आहे. परिणामी गावच्या प्रवेशद्वारावर "करंजी" नावाचाच फलक लावण्याची मांगणी गावकऱ्यांनी केली आहे.

प्रवेशद्वारावर "करंजी" नावाचाच फलक हवा - कमलेश निमगडे
करंजी गावची ओळख सर्वदूर आहे. अश्यावेळी चार घरांच्या गुड्याचा फलक दर्शनी भागात लावून तब्बल चार हजारांच्या लोकसंख्येच्या गावची ओळख मिटवणे संयुक्तिक नाही.यामुळे गावच्या प्रवेशद्वारावर करंजी नावाचेच फलक लावावे.
- कमलेश निमगडे, सामाजिक कार्यकर्ता, करंजी

-----------------------------------------------------

अनावधानाने झाले असावे - विवेक मिश्रा
या मार्गाचे काम करणारी मंडळी स्थानिक नाही, यामुळे अनावधानाने हा प्रकार झाला असावा. यात दुरुस्ती करण्यात येईल.
- विवेक मिश्रा, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top