Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपना तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्याच्या शेतातील कापूस, तूर, सोयाबीन भुईसपाट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तातडीने पंचनामे करून प्रति हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी -एड. वामनराव चटप शैलेश कोरांगे - प्रतिनिधी कोरपना - कोरपना तालुक्यात बुधव...

  • तातडीने पंचनामे करून प्रति हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी -एड. वामनराव चटप
शैलेश कोरांगे - प्रतिनिधी
कोरपना -
कोरपना तालुक्यात बुधवारी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्याच्या शेतातील कापूस, तूर, सोयाबीन भुईसपाट झाले. त्याचे तातडीने पंचनामे करून प्रति हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी माजी आमदार एड. वामनराव चटप यांनी केली.

तालुक्यातील कोरपना, कातलाबोडी, कुकुडबोडी, बोरगाव, केरामबोडी, गणेशमोड, हेटी, शेरज बू , कोडशी, धोपटाळा आदी शेतशिवारातील शेकडो हेक्टरवरील हाती आलेले कापूस ,तूर व कापणीवर आलेले सोयाबीन पूर्णत वादळी वाऱ्याच्या तडाख्यात जमीन दोस्त झाली.

परिणामी, शेतकरी चांगलाच अडचनीत आला आहे. यात उत्पादनात तूट व आर्थिक विवंचना या दोन्ही बाबींचा त्याला फटका बसणार आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने सर्वेक्षण करून शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या पूर्वी त्यांनी नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती निळकंठ कोरांगे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अरुण नवले, रमाकांत मालेकर, बंडू राजूरकर, अविनाश मुसळे, पद्माकर मोहितकर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोरोना काळात देखील माजी आमदार वामनराव चटप हे सतत सक्रिय असून मतदारासंघातील पूरग्रस्त कुलथा येथे देखील त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली होती. आता, कोरपना तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात देखील त्यांनी पाहणी केल्याने शेतकऱ्यांनी आभार मानले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top