- २०० युनिट पर्यंत वीज बिल माफ करण्याची व दर वाढ मागे घेण्याची मागणी
चिमूर -
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मागील मार्च २०२० पासून अनेक उद्योगधंदे व कामेबंद आहेत. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत्या क्रमात असून अनेक नागरिक आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच वाढून आलेले वीज बिल ही डोकेदुखी ठरत असल्याने या संदर्भात कुणबी समाज संघटना चिमूर यांच्या मार्फतीने वीज बिल कमी करण्याच्या संदर्भात उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्या मार्फतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.
२०० युनिट पर्यंत विजबिल माफ करणे, वीज दरवाढ मागे घेणे, वीजबिल न भरल्यास वीज जोडणी कपात न करणे ह्या मुख्य मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. निवेदन देतांना कुणबी समाज संघटना चिमूर चे पदाधिकारी गजानन शिंदे, रमेश करारे, विलासजी वडस्कर, गणपती ठाकरे, बालाजी ढाकुनकर, पवन कारेकर, पवन ठाकरे, प्रमोद शास्त्रकार, निळकंठ धोटे, प्रणय शिंदे उपस्थित होते.











टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.