Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची बदली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अरविंद साळवे पदभार स्वीकारणार श्रावण कुमार - प्रतिनिधी चंद्रपूर - राज्यातील बहुचर्चित पोलीस बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला असून चंद्रपूर जिल्...

  • अरविंद साळवे पदभार स्वीकारणार
श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -
राज्यातील बहुचर्चित पोलीस बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला असून चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली आहे. आता चंद्रपूर जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे हे पदभार स्वीकारणार करणार आहे. महेश्वर रेड्डी चंद्रपूर येण्यापूर्वी गङचिरोली येथे होते. जुलै 2018 पासून ते चंद्रपूरात कार्यरत होते. गेल्या महिनाभरापासून त्यांची बदली होणार असल्याची चर्चा होती मात्र तब्बल महिनाभरा नंतर त्यांच्या बदलीचे आदेश आले आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या एकाचवेळी बदली होईल, असे भाकित वर्तविण्यात येत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारीवर आळा घालण्यात पोलीस अधीक्षक अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून बदली ही मागणी मागील महिन्यात केली होती. त्यांच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध दारुविक्री मोठ्या प्रमाणात वाढली.

चंद्रपुरात नव्याने दाखल होणारे अरविंद साळवे हे भंडारा येथे कार्यरत आहेत. ते फेब्रुवारी 2019 रोजी भंडारा येथे रुजू झाले होते. अरविंद साळवे यांनी यापूर्वी अमरावती ग्रामीणचे उपपोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक, नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त म्हणून पदभार सांभाळला आहे. त्यांची आता चंद्रपूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. 

राज्य सरकारने अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या सहा अधिकाऱ्यांच्या आणि अधीक्षक दर्जाच्या 22 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी १७ बाप्ये,सप्टेंबर ला रात्री उशिरा जाहीर केले.











About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top