- वाहन चालवितांना सर्व आवश्यक कादगपत्रे सोबत बाळगण्याचे
- २५ सप्टेंबर पासुन सुरु होणार वाहन तपासणी मोहिम
सदर वाहन तपासणी मोहिमे दरम्यान दुचाकीसह चारचाकी वाहन चालक यांच्याकडील वाहन चालन परवान्याची वैद्यता व वाहनांची आवश्यक कागदपत्रांची, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, नियमानुसार नंबर प्लेट आहे की नाही, कर्णकर्कश हॉर्न आदी गोष्टींची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी मध्ये विशेषतः वाहनांचे कमांक, वाहनांचे कागदपत्र यावर जास्त भर देण्यात येणार असुन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
करीता, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांचे कडुन शहरातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, सर्व वाहनधारक यांनी वाहन चालवितांना सोबत वाहन चालविण्याबाबत सर्व आवश्यक कादगपत्रे सोबत बाळगुन पोलीस ठाणे चंद्रपूर शहर, पोलीस ठाणे रामनगर व पोलीस ठाणे दुर्गापूर सह शहर वाहतुक नियंत्रण शाखा चंद्रपूर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वाहन तपासणी मोहिमे दरम्यान योग्य सहकार्य करावे.

Chhan
उत्तर द्याहटवाफक्त चद्रपुर कि जील्हा
उत्तर द्याहटवाchandrapur
उत्तर द्याहटवा