Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वेळेवर उपचार न मिळाल्याने दोघांचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मृतकात एक डॉक्टरही चंद्रपुरातील ह्रदय विदारक घटना निष्पाप बळीचे जवाबदार कोण ? आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर - कोरोना व्यतिरिक्त इत...

  • मृतकात एक डॉक्टरही
  • चंद्रपुरातील ह्रदय विदारक घटना
  • निष्पाप बळीचे जवाबदार कोण ?
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
कोरोना व्यतिरिक्त इतर कोणतेही आजार या मानव समाजात नाही का मग वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित डॉक्टर उपचार करायला का नकार देतात व उपचाराअभावी एका डॉक्टर चा जर मृत्यू होत असेल तर याला जबाबदार कोण ? आज चंद्रपूर जिल्हा व अनेक तालुक्यातील अनेक डॉक्टरांनी सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करायला मागे पुढे पाहतात एखादा गंभीर स्वरूपाचा जरी रुग्ण असला तरी उपचार करायला नकार देतात अशीच परिस्थिती काल 21 सप्टेंबर ला चंद्रपूर शहरात घडल्याची माहिती आहे व वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे उपचाराअभावी 2 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला विशेष बाब म्हणजे यातील एक नागरिक डॉक्टर आहे. 

या विषयीच्या अधिक माहितीनुसार चंद्रपूर शहरातील शास्त्रीनगर वॉर्ड येथील डॉक्टर दुधे यांना पल्स चा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला अडचण जाणवू लागल्यामुळे त्यांना चंद्रपूर शहरातील प्रतिष्ठित अशा अनेक डॉक्टरकडे नेण्यात आले मात्र एकाही डॉक्टरांनी वेळेवर उपचार करणे तर सोडाच साधे तपासण्यासही नकार दिला.

त्यामुळे डॉक्टर दुधे यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या काही वेळातच डॉ दुधे यांचा मृत्यू झाला तसेच शासकीय रुग्णालय चंद्रपूर च्या वतीने डॉक्टर दुधे यांचा हार्ट अटेक ने मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.

20 सप्टेंबरला चंद्रपूर शहरातील भानापेठ परिसरातील असणाऱ्या एका 60 वर्षीय नागरिकांचा बीपी कमी झाल्यामुळे अस्वस्थ वाटू लागल्यामुळे अनेक प्रतिष्ठित डॉक्टरकडे दाखविण्यात आले असता एकाही डॉक्टर ने उपचार करण्यास नकार दिला त्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल केले असता शासकीय रुग्णालयातून नागपूर येथे रेफर केले असता नागपूरला पुढील उपचारार्थ नेत असताना वाटेतच सकाळी 9:00 वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला चंद्रपूर शहरात घडलेल्या या घटनांमुळे वेळीच जर या रुग्णाला उपचार मिळाला असता तर या रुग्णाचा जीव वाचला असता.

मात्र उपचाराअभावी या 2 निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला यामुळे असा प्रश्न निर्माण होत आहे की कोरोना व्यतिरिक्त ईतर आजार नाहीत का ? जर नागरिकांमध्ये कोरोना सुदृश लक्षणे नसतील तर अशा रुग्णाला उपचार मिळणे गरजेचे आहे मात्र उपचाराअभावी एका डॉक्टरचा मृत्यू होणे ही वैद्यकीय क्षेत्रातील एक प्रश्न निर्माण करणारी घटना आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top