Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूर शहर पोलीस आणि वाहतुक पोलिसां तर्फे सुरु होणार वाहन तपासणी मोहिम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वाहन चालवितांना सर्व आवश्यक कादगपत्रे सोबत बाळगण्याचे २५ सप्टेंबर पासुन सुरु होणार वाहन तपासणी मोहिम श्रावण कुमार - प्रतिनिधी चंद्रपूर - जिल...

  • वाहन चालवितांना सर्व आवश्यक कादगपत्रे सोबत बाळगण्याचे
  • २५ सप्टेंबर पासुन सुरु होणार वाहन तपासणी मोहिम
श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -
जिल्हयातील पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांचे मार्गदर्शनाखाली वाहतुक नियमनासाठी, शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावे, त्याच बरोबर अवैध वाहन चालकांवर नियंत्रण राहावे, सुरक्षित वाहतुकीसाठी घालून दिलेल्या कार्यपध्दती पाळण्यावर भर देण्यासाठी तसेच वाहन चोरी व तत्सम गुन्ह्यांवर अंकुश लावण्याकरीता पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहतुक नियंत्रण शाखेसह शहर पोलीसांच्या संयुक्तविद्यमाने शुक्रवार दिनांक २५ सप्टेंबर २०२० पासुन चंद्रपूर शहरात वाहन तपासणी मोहीम सुरु होणार आहे.

सदर वाहन तपासणी मोहिमे दरम्यान दुचाकीसह चारचाकी वाहन चालक यांच्याकडील वाहन चालन परवान्याची वैद्यता व वाहनांची आवश्यक कागदपत्रांची, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, नियमानुसार नंबर प्लेट आहे की नाही, कर्णकर्कश हॉर्न आदी गोष्टींची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी मध्ये विशेषतः वाहनांचे कमांक, वाहनांचे कागदपत्र यावर जास्त भर देण्यात येणार असुन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

करीता, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांचे कडुन शहरातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, सर्व वाहनधारक यांनी वाहन चालवितांना सोबत वाहन चालविण्याबाबत सर्व आवश्यक कादगपत्रे सोबत बाळगुन पोलीस ठाणे चंद्रपूर शहर, पोलीस ठाणे रामनगर व पोलीस ठाणे दुर्गापूर सह शहर वाहतुक नियंत्रण शाखा चंद्रपूर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वाहन तपासणी मोहिमे दरम्यान योग्य सहकार्य करावे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top