- जिल्हाधिकारी यांच्या मार्फ़त मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देऊन केली मागणी
बल्लारपूर -
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरना सदृश्य परिस्थिती एकदम भयावह झाली असून चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी बेड मिळणे कठीण झाले आहे. बेड न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांचा उपचारापूर्वीच जीव गेला आहे व जात आहे. हे आजचे भयानक वास्तव समोर येत आहे. जिल्हा कोविड १९ रुग्णालयात रुग्णाला पाहिजे तेवढा औषधसाठा उपलब्ध नाही. कोरोना व्यतिरिक्त इतरही बिमारीच्या इलाजाकडे डॉक्टरांकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेकांचा जीव गेला आहे. तरी त्वरित प्रशासकीय स्तरावरून खालील उपाययोजना करण्यात याव्या करिता उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू जोडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले
- covid-19 रुग्णाला रुग्णालयात मोफत मुबलक प्रमाणात औषधाचा साठा उपलब्ध करून देण्यात यावा.
- कोरोना व्यतिरिक्त इतर बिमारीकडे जातीने लक्ष देऊन त्यांची काळजीपूर्वक इलाज करण्यात यावा.
- covid-19 रुग्णालयात सिटी स्कॅन ची व्यवस्था करण्यात यावी.
- महानगरपालिके द्वारा मोठे covid-19 रुग्णालय निर्माण करण्यात यावे.
- डॉक्टर व इतर स्टॉप चा तुटवडा भरून काढण्यात यावा.
- जनता कर्फ्यू हा सामान्य जनता व छोटे मध्यम व्यापारी यांचे नुकसान करणारे असून त्याऐवजी इतर उपाययोजना करून जनतेचे हित साध्य करण्यात यावे.
- कोरोनाग्रस्त रुग्णांचे मोफत इलाज करण्यात यावा.
- जिल्हातील प्रत्येक तालुक्यात कोरोना केअर सेंटर उभारण्यात यावे .
वरील सर्व मागण्या ह्या जनहिताच्या असून तात्काळ यावर उपायोजना करण्यात यावा अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.