Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शकुंतला लॉन येथील जंबो कोविड रूग्‍णालयाशी भाजपा पदाधिकाऱ्यांचा कोणताही संबंध नाही
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
26 सप्‍टेंबर ला 1000 खाटांचे कोविड रूग्‍णालय खनिज विकास निधीतुन स्‍थापन करण्‍यासाठी भाजपातर्फे जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन बातम्‍या प...

  • 26 सप्‍टेंबर ला 1000 खाटांचे कोविड रूग्‍णालय खनिज विकास निधीतुन स्‍थापन करण्‍यासाठी भाजपातर्फे जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
  • बातम्‍या प्रसिध्‍द करून भाजपाची अकारण बदनामी करण्याचा डाव
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर जिल्‍हयातील कोविड रूग्‍णांच्‍या उपचारासाठी शकुंतला लॉन येथे उभारण्‍यात येणाऱ्या 700 खाटांच्‍या जंबो कोविड रूग्‍णालयाच्‍या उभारणीवरून अकारण भारतीय जनता पार्टीला गोवले जात असून याच्‍याशी भारतीय जनता पार्टीचा कोणताही संबंध नाही. भाजपा हा दीन, दुर्बल, शोषित, पिडीत जनतेच्‍या हितासाठी, कल्‍याणासाठी कार्य करणारा पक्ष आहे. आम्‍ही शासकीय पातळीवर 1000 खाटांचे रूग्‍णालय कोविड रूग्‍णांना निःशुल्‍क उपचार देण्‍यासाठी खनिज विकास निधीतुन स्‍थापन करावे अशी मागणी केली आहे व ही मागणी पूर्ण करावी अन्‍यथा आम्‍ही आंदोलनाची भूमीका घेतली आहे, असे भाजपातर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

गेल्‍या दोन दिवसांपासून शकुंतला लॉन येथे उभारण्‍यात येणाऱ्या 700 खाटांच्‍या जंबो कोविड रूग्‍णालयाच्‍या उभारणीवरून विविध वृत्‍तपत्रांमध्‍ये बातम्‍या प्रसिध्‍द होत असून यात भाजपाची अकारण बदनामी केली जात आहे. भाजपाचे महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी शकुंतला लॉन येथील जंबो हॉस्‍पीटल संदर्भात कोणताही प्रस्‍ताव महानगरपालिकेला सादर केलेला नाही. त्‍याचप्रमाणे महानगरपालिकेने यासंदर्भातील प्रस्‍तावाला दिलेली तत्‍वतः मान्‍यता ही प्रशासकीय पातळीवरील बाब असून त्यांचा पदाधिकाऱ्यांचा कोणताही संबंध नाही. अशा पध्‍दतीचे शकुंतला लॉन येथील जंबो हॉस्‍पीटल उभारण्‍यात येत असेल तर ते योग्‍य आहे किंवा नाही, सर्वसामान्‍य जनतेच्‍या हिताचे आहे किंवा नाही ही बाब जिल्‍हाधिकारी, मनपा आयुक्‍त, आरोग्‍य यंत्रणेचे प्रमुख यांनी तपासून निर्णय घेण्‍याची आवश्‍यकता आहे. मात्र अकारण यात भाजपा पदाधिकाऱ्यांवर आरोप केले जात आहे जे पूर्णतः निराधार व चुकीचे आहे. जिल्‍हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि हा प्रस्‍ताव जर गोरगरीब जनतेच्‍या हिताचा नसेल तर तो त्‍वरीत रद्द करावा आणि 1000 खाटांचे अत्‍याधुनिक कोविड रूग्‍णालय कोविड रूग्‍णांच्‍या निःशुल्‍क उपचारासाठी खनिज विकास निधीतुन स्‍थापन करावे अशी मागणी भाजपातर्फे करण्‍यात आली आहे.

1000 खाटांचे अत्‍याधुनिक कोविड रूग्‍णालय कोविड रूग्‍णांच्‍या निःशुल्‍क उपचारासाठी खनिज विकास निधीतुन स्‍थापन करावे या मागणीसाठी दोन दिवसापूर्वी आम्‍ही जिल्‍हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असून 48 तासांच्‍या आत निर्णय न घेतल्‍यास आम्‍ही आंदोलन करू असा ईशारा दिला आहे. त्‍यानुसार दिनांक 26 सप्‍टेंबर रोजी आम्‍ही भाजपातर्फे जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्‍याचे भाजपातर्फे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे यांनी जाहीर केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top