- 17 लाखाचा मुद्देमाल जप्त
- बल्लारशाह पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
बल्लारपूर -
आज सकाळी चंद्रपुर एलसीबी पथकाने बल्लारशाह येथे धाड टाकुन पिक-अप क्रमांक. MH 10 CR 5950 मधील 10,000 नग देशी दारु जप्त केली. आरोपी शुभम मिरासे व अभिलाष वैद्य रा. मुर्तीजापुर, अकोला यांना अटक करुन १७ लाख १०,००० रुपया चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून बल्लारशाह पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कार्यवाही चंद्रपुर एलसीबी शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात, सहा पोनि जितेंद्र बोबडे, खनके, केमेकर, नइम पठान, जमीर पठान, अनुप डांगे, मिलींद चौव्हान, प्रफुल मेश्राम व जावेद सिद्दीकी यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.