Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: समाज कल्याण विभागाकडुन दिव्यांगाना उपयोगी साहित्य तथा धनादेशाचे वितरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सिंदेवाही पंचायत समितीत जि.प. अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांचेहस्ते वाटप मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी चंद्रपूर - पंतप्रधान नरेंद्रजी मो...

  • सिंदेवाही पंचायत समितीत जि.प. अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांचेहस्ते वाटप
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनाच्या शुभपर्वावर समाज कल्याण विभाग जि.प. चंद्रपूर यांचेवतिने तालुक्यातील दिव्यांग बंधूभगिनींना उपयोगी साहित्याचे वाटप तथा धनादेशाचे वितरण कार्यक्रम आज पंचायत समिती सभागृहात पार पडले. याप्रसंगी दिव्यांग बांधवांना धनादेश, व्हीलचेअर, कुबडी, इ. उपयोगी साहित्य तर आंतरजातीय दिव्यांग-अव्यांग विवाह योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर लाभाचे धनादेश ही जि.प. अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांचेहस्ते वितरित करण्यात आले. 

याप्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून, समाजकल्याण सभापती नागराजभाऊ गेडाम, पं.स. सभापती सौ. मंदाताई बाळबुद्धे, समाजकल्याण अधिकारी जाधव साहेब, संवर्ग विकास अधिकारी इल्लुरकर यांसह तालुक्यातील दिव्यांग बंधुभगिनी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top