- केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे आ. सुधीर मुनगंटीवार यांना आश्वासन
ऑगस्ट महिन्या अखेरीस गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थिती दरम्यान पोंभुर्णा व मुल तालुक्यातील शेतक-यांच्या शेताचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. या पुरपरिस्थितीचा पाहणी दौरा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केला. यावेळी नागरिकांनी चंद्रपूर जिल्हा सिमा ते जुनगांव, देवाडा, नांदगांव या रस्त्यावरील वैनगंगा नदीवर अॅप्रोच रोडसह मोठया पुलाचे बांधकाम करण्याची तसेच जुनगांव येथील पुलाची उंची वाढविण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांच्याकडे केली. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सदर मोठया पुलाचे बांधकाम व पुलाची उंची वाढविण्याबाबत केंद्रीय मार्ग निधीतुन मंजुरी मिळविण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. सदर आश्वासनानुसार त्यांनी याबाबत केंद्रीय भुतल परिवहन मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्याकडे निवेदन सादर केले असुन त्यांच्याशी चर्चा केली. सदर पुलाच्या बांधकामासाठी केंद्रीय मार्ग निधीतुन 95 कोटी रू. निधी मंजुर करण्यात येईल असे आश्वासन ना. नितीनजी गडकरी यांनी आ. मुनगंटीवार यांना दिले आहे.











टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.