ईद-ए-मिलाद व श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पर्यायी मार्ग निश्चित
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 1 सप्टेंबर 2025) -
चंद्रपूर शहरात 5 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद निमित्त आयोजित जुलूस व रॅली तसेच 6 सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी वाहतूक बदलासंबंधी आदेश निर्गमित केले असून नागरिकांनी व गणेशभक्तांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
🚦 वाहतूक बदल – 5 सप्टेंबर (ईद-ए-मिलाद जुलूस)
- सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत वाहतूक बदल लागू राहील.
- कोहिनूर ग्राउंड-दस्तगीर चौक-मिलन चौक-गांधी चौक-जयंत टॉकीज चौक-जटपुरा गेट-प्रियदर्शनी चौक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद.
- हा मार्ग नो-पार्किंग झोन म्हणून घोषित.
- नागपूर, बल्लारशा, मुल, वरोरा दिशेहून येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित.
🚧 वाहतूक बदल – 6 सप्टेंबर (श्री गणेश विसर्जन मिरवणूक)
- गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर 6 सप्टेंबर सकाळी 6 वाजल्यापासून ते 7 सप्टेंबर सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक बदल लागू राहील.
- प्रियदर्शनी चौक-जटपुरा गेट-कस्तुरबा चौक-गांधी चौक-रामनगर-संत केवलराम चौक-रामसेतू पुल मार्गावरील सर्व वाहने बंद.
- नागपूर, बल्लारशा, मुल, वणी, गडचांदूर, घुग्घुसकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित.
- शहरातील नागरिकांनी सुचविलेल्या मार्गांचा वापर करावा.
🅿️ नो-पार्किंग आणि नो-हॉकर्स झोन
- जटपुरा गेट-कस्तुरबा चौक, प्रियदर्शनी चौक-जटपुरा गेट, गांधी चौक-मिलन चौक, दस्तगीर चौक-मिलन चौक, छोटा बाजार चौक-पाताळेश्वर मंदिर यासह 12 प्रमुख मार्ग नो-पार्किंग व नो-हॉकर्स झोन म्हणून घोषित.
- नागरिकांनी वाहने अनधिकृत ठिकाणी उभी करू नयेत.
- रहिवाशांनी आपली वाहने जुबली हायस्कूलचे पटांगण व महानगरपालिकेजवळील पार्किंग येथे ठेवावीत.
🚙 बाहेरून येणाऱ्यांसाठी पार्किंग व्यवस्था
- चांदा क्लब ग्राउंड
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, वरोरा नाका
- सेंट मायकल हायस्कूल, नगीनाबाग
- सिंधी पंचायत भवन, रामनगर
- व्यायामशाळा ग्राउंड, पठाणपुरा चौक
- डी.एड. कॉलेज ग्राउंड, बाबुपेठ
- महाकाली मंदिर ग्राउंड
⚠️ प्रशासनाचे आवाहन
- नागरिकांनी व मंडळांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
- नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
वाहतूक सुरळीत राहावी म्हणून सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्पष्ट केले आहे.
#ChandrapurTrafficUpdate #EidMiladProcession #GaneshVisarjan2025 #TrafficDiversion #NoParkingZone #ChandrapurPolice #SafeProcession #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
Major-changes-in-city-traffic-routes-on-September-5th-and-6th-Alternative-routes-decided-during-Eid-e-Milad-and-Shri-Ganesh-Visarjan-procession
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.