गणेशोत्सवाच्या माध्यमातून मानवतेचा संदेश
शिवशक्ती सार्वजनिक गणेश मंडळाचा अनोखा उपक्रम
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०३ सप्टेंबर २०२५) -
गणेशोत्सवाच्या उत्साहात सामाजिक बांधिलकी जपत शिवशक्ती सार्वजनिक गणेश मंडळ, रामपूर यांनी थरारक व प्रेरणादायी रक्तदान शिबिराचे आयोजन करून परिसरातील तरुणाईत एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली. “बाप्पा मोरया – रक्तदान थोर कार्या” या घोषणांनी गजबजलेल्या शिबिरात ३५ हून अधिक तरुणांनी जीवनदायी रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला.
या रक्तदान मोहिमेत पुढाकार घेऊन रक्तदान करणाऱ्यांमध्ये मंगेश झाडे, अमोल मालेकर, शिवसेना नेते रमेश झाडे, सुरज गव्हाणे, विनोद काटवले, मनोज झाडे, अच्युत बावणे, हर्षल निमकर, पवन विरुडकर, नितीन ताणकर, रणजीत वासेकर, महेंद्र मल्लकुर्तीवार, रंजीत दुबे, प्रीतम बिडवे, प्रशांत मोरे, सतीश थेरे, अतुल हिंगाने, विकास खिरवटकर, अविनाश आत्राम, गुरुनाथ बुडे, अजय माळेकर, निखिल कौरासे, शंकर अंदगुला, मुरली कोंगरे, सुरज मालेकर, राहुल काळे, महेश आसुटकर, चेतन जमपल्लीवार आणि अमित मालेकर या तरुणांचा समावेश होता.
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात पुढाकार घेतल्यामुळे वातावरणात भक्तीबरोबरच सामाजिकतेची चुणूक जाणवत होती. उपस्थितांनी तरुण रक्तदात्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. रक्तदान केलेल्या प्रत्येकाला प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. मंडळाचे पदाधिकारी म्हणाले की, “गणेशोत्सव हा फक्त जल्लोषासाठी नसून समाजकार्यासाठी एक व्यासपीठ आहे. रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचतील, हीच खरी बाप्पाची सेवा आहे.”
#GaneshUtsav #BloodDonation #YouthPower #SocialCommitment #ChandrapurUpdates #RampurNews #GaneshFestival #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.