Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: युवकांनी जबाबदारीने उत्सव साजरा करावा – संदीप पाटील
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
युवकांनी जबाबदारीने उत्सव साजरा करावा – संदीप पाटील श्री गणेशोत्सवात लेझर लाइटिंग व कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई पोलीस-नागरिकांच्या सहकार्याने ...
युवकांनी जबाबदारीने उत्सव साजरा करावा – संदीप पाटील
श्री गणेशोत्सवात लेझर लाइटिंग व कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई
पोलीस-नागरिकांच्या सहकार्याने शांततापूर्ण गणेशोत्सवाचे नियोजन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २८ ऑगस्ट २०२५) -
श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आज दुपारी पोलीस मुख्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र नागपूर संदीप पाटील यांनी भूषविले.

        संदीप पाटील यांच्या संकल्पनेनुसार Social Harmony (सामाजिक सलोखा) नावाचे व्हॉट्सअॅप गट तयार करण्यात आले असून, त्यामध्ये जिल्ह्यातील प्रतिष्ठीत नागरिक, जिल्हा शांतता समिती सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांचा समावेश आहे. याच गटाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याच्या उद्देशाने ही आढावा बैठक झाली.
        बैठकीत पाटील यांनी स्पष्ट केले की, कायद्याचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. धार्मिक श्रद्धा व नागरिकांचा उत्साह अबाधित राखत उत्सव शांततेत साजरा होईल, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. त्यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "गुन्हा नोंद झाल्यास त्याचा भविष्यावर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे जबाबदारीने व शिस्तबद्धतेने उत्सव साजरा करावा." तसेच ध्वनी प्रदूषण कायदा काटेकोरपणे अंमलात आणला जाईल, मिरवणुकीत धोकादायक लेझर लाईटिंग यंत्रांचा वापर करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असे आश्वासनही देण्यात आले.

        या वेळी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी नागरिकांना आवाहन केले की, "शांतता व शिस्त राखण्यासाठी नागरीकांनी पुढाकार घ्यावा. पोलीस दल हे केवळ कायदा अंमलबजावणी करणारे यंत्र नसून नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्य करणारा महत्वाचा घटक आहे."

        बैठकीत अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर सुधाकर यादव, चिमूर दिनकर ठोसरे, ब्रम्हपुरी राकेश जाधव, वरोरा संतोष बाकल, गडचांदुर रविंद्र जाधव, जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयातील शाखा प्रमुख, जिल्हा शांतता समिती सदस्य, पत्रकार व मान्यवर नागरिक उपस्थित होते.

#GaneshUtsav2025 #ChandrapurPolice #LawAndOrder #SafeGaneshFestival #SocialHarmony #NoisePollutionControl #CommunitySafety #NagpurRangePolice #sandippatil #mumakkasudarshan #InspectorGeneralofPoliceNagpurArea #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top