कोच एस-३ मध्ये आढळला मृतदेह - बल्लारशाह रेल्वे स्थानकावर खळबळ
आमचा विदर्भ - राजेश अरोरा
बल्लारपूर (दि. २८ ऑगस्ट २०२५) -
बल्लारपूर रेल्वे स्थानकावर आज दुपारी एक धक्कादायक घटना घडली. मुंबईहून येणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेस गाडी क्रमांक ११००१ मध्ये एका प्रवाशाने शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात काही काळासाठी खळबळ उडाली. दुपारी सुमारे १.२० वाजता नंदीग्राम एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक ०५ वर पोहचली. नेहमीप्रमाणे सी अँड डब्ल्यू विभागामार्फत गाडीची तपासणी सुरू असताना कोच क्रमांक एस-३ मधील उजव्या बाजूचे शौचालय आतून बंद असल्याचे दिसून आले. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र अपयश आले. याबाबतची माहिती तात्काळ स्टेशन प्रबंधक बल्लारपूर यांना देण्यात आली. रेल्वे प्रशासनाने प्रयत्न करून दार उघडले असता, आत एका प्रवाशाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, मृत प्रवाशाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये आणि स्थानक परिसरात तणाव व भीतीचे वातावरण पसरले.
#BallarpurStation #ballarshahrailwaystation #NandigramExpress #TrainSuicide #RailwayNews #Chandrapur #BreakingNews #IndianRailways #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.