मुसळधार पावसाने केली विध्वंसाची नांदी – वीजतारेने घेतला शेतकऱ्याचा बळी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
कोरपना / चंद्रपूर (दि. ०३ सप्टेंबर २०२५) -
कोरपना तालुक्यातील रायपूर शेतशिवारात मंगळवार (दि. 2) सकाळी मृत्यूचा थरकाप उडवणारी घटना घडली. शेतात काम करत असताना विद्युत खांबावरील तारा तुटून कुंपणावर पडल्याने तुकाराम रामचंद्र आत्राम (वय 55, रा. रायपूर) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या भीषण घटनेत गीता अनिल आत्राम (वय 47), प्रकाश रामचंद्र आत्राम (वय 45) आणि अशोक आत्राम (वय 47 रा. रायपूर) हे तिघे गंभीर जखमी झाले.
सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने परिसरात हाहाकार माजवला होता. त्याच दरम्यान विद्युत खांबाचा प्रवाहित तारा तुटून शेताच्या तारेच्या कुंपणावर पडला. मंगळवारी सकाळी शेतात गेलेल्या तुकाराम आत्राम यांनी अनवधानाने कुंपणाच्या तारेला हात लावला आणि क्षणार्धात करंट लागून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या गीता अनिल आत्राम, प्रकाश आत्राम आणि अशोक आत्राम यांनाही विजेच्या तडाख्याचा फटका बसला. घटनास्थळी मृत्यूचे वातावरण निर्माण झाले होते. पण लगतच्या नागरिकांनी समयसूचकता दाखवून बांबूच्या साहाय्याने तिघांना विद्युत तारेपासून अलग केले, त्यामुळे त्यांचे प्राण थोडक्यात वाचले. मात्र ते गंभीर जखमी झाल्याने तातडीने ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक देवानंद केकन यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे पाठवण्यात आला. जखमींवर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार सुभाष धोटे आणि माजी आमदार वामनराव चटप यांना मिळताच त्यांनी रायपूर गाठून मृतकाच्या कुटुंबीयांना धीर दिला. या दुर्घटनेने रायपूर गावात शोककळा पसरली असून वीज विभागाच्या हलगर्जीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
#ElectricShock #FarmerDeath #KorapnaTragedy #RaipurAccident #RainHavoc #MaharashtraNews #JusticeForFarmers #Memberofparliyament #pratibhadhanorkar #subhashdhote #advwamanraochatap #policestationkorpana #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.