रामपूर वॉर्डातील शिव मंदिर परिसर झाला स्वच्छतेने उजळून
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०१ सप्टेंबर २०२५) -
रामपूर वॉर्ड क्र. १ येथील शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी आज शिव मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर व परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प मंडळाच्या सदस्यांनी केला असून, मोठ्या संख्येने युवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
या उपक्रमात शिवसेना नेते व सदस्य रमेश झाडे, विनोद काटवले, अमित मालेकर, अमोल मालेकर, सतीश थेरे, रामकृष बरडे, महेंद्र येमलकुर्तीवार, अच्युत बावणे, दिलीप ठेंगणे, आकाश अगडे, रितेश पायपरे, रंजीत वासेकर, हर्षल निमकर, सुरज गव्हाणे, मनीष लांडे, तुषार दिवसे, अंकित बोबाटे, मंगेश झाडे, प्रफुल जीवतोडे, धीरज साळवे, प्रणय भोंगडे, राकेश पायपरे, राहुल काळे, कृष्णा गीते, सुरज भगत, पंकज डेरकर, मयूर गीते, गौरव कौरासे, राकेश चौधरी, रोशन बोरुले, सौरभ शिरपुरे, बंडू सिडाम, ऋषिकेश निवडिंग, प्रशांत इटनकर, गजू झाडे, प्रज्वल भोंगळे, सुरज सिडाम, तुषार लोकरे, मयंक पाचभाई, साहिल टेकाम, विष्णू आत्राम, वंदन काटकर, स्मित थेरे आणि अनिकेत कापसे यांनी श्रमदान केले. शिव मंदिर परिसरातील कचरा, गवत व अस्वच्छता दूर करून परिसर स्वच्छ, सुशोभित करण्यात आला. समाजातील युवकांनी एकत्र येऊन पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संदेश दिला.
#CleanlinessDrive #GaneshFestival2025 #YouthForSociety #EcoFriendlyGanesh #SwachhBharat #CommunityService #GreenInitiative #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.