बल्लारपूरात महिला सेनेचा दमदार प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
बल्लारपूर (दि. 1 सप्टेंबर 2025) -
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या बल्लारपूर तालुकाध्यक्ष कल्पना पोतर्लावार यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन विविध क्षेत्रातील शेकडो महिलांनी मनसेत प्रवेश करून पक्षाच्या बळकटीस हातभार लावला. या सोहळ्यात नव्याने प्रवेश करणाऱ्या महिलांना पक्षाचा झेंडा देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार उपस्थित होते. यावेळी जिल्हासचिव किशोर मडगुलवार, मनवीसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, पोंभुर्णा तालुकाध्यक्ष आशिष नैताम, चंद्रपूर तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे आदी मान्यवर उपस्थित होते. वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष कल्पना पोतर्लावार यांचा सत्कार करून शुभेच्छांचा वर्षाव केला.
आपल्या मनोगतात कल्पना पोतर्लावार म्हणाल्या, “महिला सक्षमीकरणासाठी, त्यांच्या हक्कांसाठी व समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच पर्याय आहे. आज इतक्या मोठ्या संख्येने महिलांनी पक्षात प्रवेश केला याचा मला अभिमान आहे.” यावेळी महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रमही घेण्यात आला.
मनसेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की, “राजसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण मोठ्या संख्येने मनसे परिवारात सामील झाला आहात. ज्या विश्वासाने तुम्ही मनसेचा झेंडा हाती घेतला त्या विश्वासाला आम्ही कधीच तडा जाऊ देणार नाही.”
या कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हासचिव किशोर मडगुलवार यांनी विशेष परिश्रम घेतले. या पक्ष प्रवेशामुळे मनसे महिला सेनेची ताकद बल्लारपूरात आणखी वाढली असून आगामी काळात ही ताकद समाजहिताच्या चळवळीत परिवर्तित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सदर कार्यक्रमाला प्रविण शेवते, राजु देवांगन, रुग्णमित्र क्रिष्णा गुप्ता, मनविसे पोंभुर्णा तालुका उपाध्यक्ष राजेश गेडाम, फिरोज पठान, आशिष चटपल्लीवार, निखील दुर्ग, चिंन्दु दुर्गे तसेच मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#MNSWomenPower #BallarpurRising #RajThackerayVision #WomenEmpowerment #MNSStrength #PoliticalEntry #KalpanaPotarlawar #MNSChandrapur #WomenInPolitics #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.