Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: डोंगरगाव–राजुरा बस प्रवासात गर्दीचा कहर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
डोंगरगाव–राजुरा बस प्रवासात गर्दीचा कहर बस क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी; प्रशासनाचे डोळे झाक विद्यार्थ्यांना शाळा–कॉलेजला पोहोचण्यात अडचणी आम...
डोंगरगाव–राजुरा बस प्रवासात गर्दीचा कहर
बस क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी; प्रशासनाचे डोळे झाक
विद्यार्थ्यांना शाळा–कॉलेजला पोहोचण्यात अडचणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०२ सप्टेंबर २०२५) -
        राजुरा तालुक्यातील डोंगरगाव – राजुरा दरम्यान विद्यार्थ्यांना तसेच सामान्य प्रवाशांना दररोज गंभीर गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. प्रवासी क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी बसमध्ये कोंबून प्रवास करावा लागत असल्याने विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शाळा–कॉलेज गाठतात. अनेकदा जागा न मिळाल्याने लहान मुले, विद्यार्थिनी तसेच नागरिकांना थांब्यांवरून परत जावे लागते. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार सकाळी डोंगरगाव – राजुरा सकाळी 8.00 वाजता आणि राजुरा – डोंगरगाव सकाळी 9.00 वाजता स्वतंत्र बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
        स्थानिक गावकरी, पालक तसेच विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, या मार्गावर दररोज विद्यार्थी आणि प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. क्षमता ओलांडून बसमध्ये प्रवास करणं म्हणजे अपघाताचे आमंत्रण असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व पक्ष, संघटना, समाजसेवक, नेते, पुढारी, लोकसेवक, पत्रकार, गावकरी, ग्रामपंचायत तसेच प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपापल्या स्तरावर तातडीने प्रयत्न करावेत, अशी एकमुखी मागणी व्यक्त होत आहे.

#StudentRights #SafeTransport #PublicDemand #RajuraIssues #BusFacility #EducationForAll #SafeJourney #RuralVoices #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top