Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रक्तदानातून युगात्मा शरद जोशींना अभिवादन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रक्तदानातून युगात्मा शरद जोशींना अभिवादन ''५० रक्तदात्यांनी दिला समाजासाठी जीवनदायी ठेवा'' शेतकरी संघटनेचे नेते व मान्यवरांच...
रक्तदानातून युगात्मा शरद जोशींना अभिवादन
''५० रक्तदात्यांनी दिला समाजासाठी जीवनदायी ठेवा''
शेतकरी संघटनेचे नेते व मान्यवरांची मोठी उपस्थिती
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०३ सप्टेंबर २०२५) -
        शेतकरी संघटनेचे संस्थापक व शेतकऱ्यांचे खंदे नेते, माजी खासदार युगात्मा शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त राजुरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता राम मंदिर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन शेतकरी संघटनेचे नेते, माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी केले. सर्वप्रथम शरद जोशी यांच्या प्रतिमेला हारार्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. या शिबिरात तब्बल ५० रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचा आदर्श घालून दिला. रक्तसंकलनाचे कार्य चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय व राजुरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व चमू यांनी पार पाडले.

        कार्यक्रमाला ॲड. मुरलीधर देवाळकर, जिल्हा परिषद माजी सभापती निळकंठ कोरांगे, रमेश नळे, प्रभाकर ढवस, शेषराव बोंडे, ॲड. श्रीनिवास मुसळे, ॲड. दीपक चटप, हरिदास बोरकुटे, दिनकर डोहे, कपिल इद्दे, भाऊजी कुळसंगे, मधुकर चिंचोलकर, पुंडलिक वाढई, बबन रणदिवे, बळीराम खुजे यांच्यासह शेतकरी संघटना, शेतकरी युवा आघाडी, शेतकरी महिला आघाडी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने सभागृहात घोषणाबाजी, उत्साह आणि शेतकऱ्यांप्रती असलेले निस्सीम प्रेम अनुभवायला मिळाले. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शरद जोशींच्या विचारांची मशाल पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

#SharadJoshiJayanti #BloodDonationCamp #RajuraEvent #FarmersMovement #SocialService #OBCYouth #sharadjoshijayanti #yugatmasharadjoshi #sharadjoshi #advwamanraochatap #advdeepakchatap #shetkarisanghtna #advmurlidhardevalkar #nilkanthkorange #prabhakardhavas #sheshraobonde #baliramkhuje #haridasborkute #dinkardohe #kapiledde #MaharashtraNews #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top